शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने नेले आणि दगडफेकीस जुंपले, तरुणांनी सांगितली आपबीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 14:42 IST

लष्करावर होणाऱ्या दगडफेकीसंदर्भात आता एक धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे.

श्रीनगर -  काश्मीर खोऱ्यात पैसे देऊन लष्कराच्या जवानांवर दगडफेक करवून घेण्यात येत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. लष्करावर होणाऱ्या दगडफेकी संदर्भात आता एक धक्कादायक गौप्यस्फोट झाला आहे. उत्त्तर प्रदेशातून नोकरीचे आमिष दाखवून काश्मीरमध्ये नेण्यात आलेल्या तरुणांना दगडफेक करण्याच्या कामास जुंपल्याचे समोर आले आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी टाइम्स नाऊने हे वृत्त प्रसारित केले आहे. बागपत आणि सहारनपूर येथून काश्मीरमध्ये नेण्यात आलेल्या युवकांनी याबाबतचा धक्कादायक अनुभव कथन केला आहे. या युवाकंना काश्मीरमधील पुलवामा येथे  दरमहा 20 हजार रुपये पगारावर टेलरची नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र नंतर त्यांना दगडफेकीचे प्रशिक्षण घेण्यास भाग पाडले. जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचल्यावर आम्हाला नोकरी देण्याऐवजी लष्करावर दगडफेक करण्याच्या कामास जुंपण्यात आले. दरम्यान, जीव वाचवायचा असेल तर काश्मीर खोऱ्यातून पळून जा, असा सल्ला एका तरुणाने आपणास दिल्याचे त्यांनी सांगितले.  सुरुवातीचे दोन ते तीन महिने मी टेलरचे काम केले. मात्र या नोकरीबाबत मी चिंतीत होतो. मी परत जाण्यासाठी परवानगी मागितली. तेव्हा मला परवानगी नाकारण्यात आली. तसेच आम्हाला चोरीच्या आरोपामध्ये फरवण्याची धमकी देण्यात आली.  दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासास सुरुवात केली आहे.  गरज पडल्यास या प्रकरणामध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCrimeगुन्हाnewsबातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेश