शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: काश्मीर हादरलं! सोनमर्गमध्ये मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारे हिमस्खलन; ११ जिल्ह्यांत हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 07:45 IST

मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्गमध्ये भीषण हिमस्खलन झाले.

Sonmarg Avalanch: निसर्गाचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या काश्मीर खोऱ्यात सध्या निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सोनमर्गमध्ये मंगळवारी रात्री १०:१२ च्या सुमारास भीषण हिमस्खलन झाले. या घटनेचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये बर्फाचा अवाढव्य डोंगर कोसळून काही क्षणांत इमारती आणि वाहनांना गिळंकृत करताना दिसत आहे.

सोनमर्गमधील सरबल भागात मंगळवारी रात्री सर्वत्र शांतता असताना अचानक डोंगरावरून बर्फाचा एक मोठा लोंढा खाली आला. पाहता पाहता या बर्फाच्या वादळाने संपूर्ण परिसराला आपल्या कचाट्यात घेतले. रस्त्यांवरील उभ्या असलेल्या गाड्या आणि स्थानिक इमारतींवर बर्फाचे थर साचले. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही, ही सर्वात मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

दळणवळण पूर्णपणे ठप्प

सलग होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. श्रीनगर विमानतळावरील धावपट्टीवर बर्फ साचल्यामुळे तब्बल ५८ विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शेकडो पर्यटक अडकून पडले आहेत. तसेच श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग काझीगुंड आणि बनिहाल दरम्यान बर्फाच्या थरांमुळे बंद करण्यात आला आहे. आपत्कालीन सेवा वगळता इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बनिहाल आणि बडगाम दरम्यानची रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र ट्रॅक साफ केल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली.

११ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा

जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून ११ जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा जारी केला आहे. यामध्ये गांदरबल, अनंतनाग, बांदीपोरा, बारामूला, कुलगाम, कुपवाडा, डोडा, किश्तवाड, पूंछ, राजौरी आणि रामबन या जिल्ह्यांचा समावेश आहे.भीषण बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते बंद असल्याने पोलीस कर्मचारी रुग्णांना स्ट्रेचरवरून बर्फातून चालत रुग्णालयात पोहोचवताना दिसत आहेत. प्रशासनाने स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.

पर्यटकांसाठी सल्ला

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत काही ठिकाणी हलका पाऊस आणि मध्यम बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या दिवसांत काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल, तर हवामानाचा अंदाज घेऊन आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच प्रवासाचे नियोजन करा.

English
हिंदी सारांश
Web Title : Kashmir Hit by Sonmarg Avalanche; High Alert in 11 Districts

Web Summary : A massive avalanche struck Sonmarg, Kashmir, disrupting life and prompting a high alert in 11 districts. The event disrupted travel, with flights and roads closed. Authorities advise tourists to stay safe and heed local guidance due to continued snowfall.
टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर