शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कसारा–मनमाड वेगवान; तिसरी-चौथी लाईन मंजूर, केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 05:17 IST

पालघर, घोटी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर हायवेच्या चौपदरीकरणालाही मान्यता; समृद्धी महामार्गासाठी महत्त्वाचा

नवी दिल्ली : मुंबई - हावडा मार्गावरील कसारा-मनमाड दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग तसेच पालघर, घोटी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर महामार्गाचे चौपदरीकरण करण्याला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. कसारा-मनमाड म्हणजे पूर्व, पश्चिम आणि मध्य भारतातील महत्त्वाचा दुवा होय.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत रेल्वे आणि हायवेच्या विस्तारासह शहरी पायाभूत विकासाशी संबंधित १ लाख ६० हजार ५०४ कोटी रुपयांच्या एकूण १० प्रकल्पांना मंजुरी दिली.

संरक्षक कठड्याचा भाग का कोसळला? समिती शोधणार कामाची गुणवत्ता, देखरेख, नियमावलींची तपासणी

यात महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा आणि कर्नाटकातील १२ जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे रेल्वेचे जाळे ३८९ किमीने विस्तारणार असून, ९७ लाख लोकसंख्येच्या ३,९०२ गावांना याचा लाभ होणार आहे. यात कसारा-मनमाड, दिल्ली-अंबाला आणि बेल्लारी-होस्पेट प्रकल्पांचा समावेश आहे.

१३१ किमीचा प्रकल्प; खर्च १०,१५४ कोटींचा

१३१ किमी लांबीचा हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार असून, यावर १०,१५४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यातील २८ किमीच्या क्षेत्रात पाच बोगदे असणार आहेत. २३७ लहान-मोठे पूल राहणार आहेत.

याशिवाय, राष्ट्रीय महामार्गावरील (१६० अ) घोटी-त्र्यंबकेश्वर-पालघर दरम्यान चौपदरीकरण होणार आहे. १५४ किमीच्या या प्रकल्पावर ३३२० कोटी रुपये खर्च येणार आहे.

मंत्रिमंडळाचे अन्य निर्णय

दिल्ली - अंबाला तिसरी- चौथी लाइन

बेल्लारी-होस्पेट तिसरी- चौथी लाइन

तेलंगणातील हैदराबाद-पणजी आर्थिक कॉरिडॉर गुडेबेलूर ते महबूबनगरपर्यंत चौपदरीकरणाला मंजुरी.

गुजरातच्या धामसिया-बिटाडा/मोवी (४७.४६ किमी) आणि नासरपूर-मालोथा (६०.२१ किमी)च्या चौपदरीकरणाला मंजुरी.

नोएडा सेक्टर १४२ पासून बॉटेनिकल गार्डनपर्यंतच्या ११.५६ किमी लांबीच्या विस्ताराला मंजुरी.

स्टार्टअप इको सिस्टीमसाठी वेंचर कॅपिटल गोळा करण्यासाठी स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स २.० ला मंजुरी.

डीप-टेक तंत्रज्ञानावर उत्पादन स्टार्टअप्स आणि नव्या स्टार्टअपसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर.

१ लाख कोटी रुपयांच्या अर्बन चॅलेंज फंडला मान्यता. प्रकल्प खर्चाच्या किमान ५० टक्के रक्कम बाजारातून उभारल्यास प्रकल्प खर्चाच्या २५ टक्के रक्कम केंद्रीय सहाय्याद्वारे दिली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Kasara-Manmad Fast Rail, Third-Fourth Line Approved by Central Government

Web Summary : The central government approved the Kasara-Manmad third and fourth rail lines, plus highway upgrades. The project, costing ₹10,154 crores, will boost connectivity. Other projects approved include highway expansions in multiple states and funding for startups, aiming to improve infrastructure and the economy.
टॅग्स :highwayमहामार्ग