चार्जिंगदरम्यान मोबाइलचा स्फोट, आई अन् दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 01:24 PM2020-08-11T13:24:14+5:302020-08-11T13:24:22+5:30

२९ वर्षीय मुथ्थुलक्ष्मी यांनी मोबाईल चार्जिंगवर लावला होता आणि ती फोनवर बोलत होती. कॉल डिस्कनेक्ट केल्यावर मोबाईलचा स्फोट झाला आहे.

karur mother and two children died after a mobile in their house exploded | चार्जिंगदरम्यान मोबाइलचा स्फोट, आई अन् दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

चार्जिंगदरम्यान मोबाइलचा स्फोट, आई अन् दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Next

तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाइल स्फोटामुळे दोन मुले आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या करूरमध्ये मोबाईलच्या स्फोटामुळे आई आणि तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. २९ वर्षीय मुथ्थुलक्ष्मी यांनी मोबाईल चार्जिंगवर लावला होता आणि ती फोनवर बोलत होती. कॉल डिस्कनेक्ट केल्यावर मोबाईलचा स्फोट झाला आहे.

मोबाईल स्फोटानंतर मुथ्थुलक्ष्मी आगीत जळून खाक झाली आणि यादरम्यान खोलीत 3 वर्षांचा रणजित आणि 2 वर्षांचा दक्षितही होता. घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. मुथ्थुलक्ष्मी आणि बालकृष्ण यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि दोघेही गेल्या काही वर्षांपासून करूरमध्ये राहत होते. दोघेही फूड स्टॉल चालवत असत, पण कर्ज वाढल्यानंतर बाळकृष्ण कुटुंबांना सोडून गेले.

मुथ्थुलक्ष्मी एकट्याने कुटुंबाचे ओझे वाहत होती, परंतु कोरोनामुळे तिची कमाई कमी झाली होती आणि हे कुटुंब आर्थिक संकटाशी झगडत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला.

Web Title: karur mother and two children died after a mobile in their house exploded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.