शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील अलमट्टी धरण ९८ टक्के भरले; ४२ हजार ५०० क्युसेकचा विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:14 IST

पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे कठीण होणार

सांगली : अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शुक्रवारी धरणात १२०.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग चालू केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यास कर्नाटक पाटबंधारे विभागाचे अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, अलमट्टी धरणात ४५ हजार ४५५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण ९८ टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी धरण १०० टक्के भरू शकते, अशी परिस्थिती आहे.यातच भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे कठीण होणार आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या खालील कर्नाटकामधील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अलमट्टी धरण व्यवस्थापनाने धरणातील विसर्ग ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठाधरण - आजचा साठा - क्षमता

  • कोयना - १००.१३ - १०५.२५
  • धोम - १२.६४ - १३.५०
  • कन्हेर - ९.४४ - १०.१०
  • वारणा - २८.९३ - ३४.४०
  • दूधगंगा - २०.५१ - २५.४०
  • राधानगरी - ८.०१ - ८.३६
  • तुळशी - ३.३६ - ३.४७
  • धोम-बलकवडी - ३.७९ - ४.०८
  • उरमोडी - ९.४४ - ९.९७
  • तारळी - ५.१७ - ५.८५
  • अलमट्टी - १२०.९२ - १२३