शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"कॉपी करून १०वी पास झालो असून याची मी PHD केले", कर्नाटकच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 15:04 IST

कर्नाटकातील एका मंत्र्याने विद्यार्थ्यांसमोर उघडपणे स्वत:चा पर्दाफाश केला आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकातील एका मंत्र्याने विद्यार्थ्यांसमोर उघडपणे स्वत:चा पर्दाफाश केला आहे. एवढेच नाही तर मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांसमोर कॉपी करून पास झालो असल्याची कबुली दिली. मंत्र्याने विद्यार्थ्यांना सांगितले की, त्यांनी परिक्षेत कॉपी करून कसे प्रभुत्व मिळवले आहे आणि कशा पद्धतीने दहावीची परीक्षा पास केली. 

कर्नाटकच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांसमोर खुलासा दरम्यान, ही घटना कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातील आहे. राज्याचे आदिवासी कल्याण मंत्री श्रीरामुलू हे बेल्लारीमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हे विधान केले आणि सर्वांचे लक्ष वेधले. परिक्षेच्या काळात कॉपी करण्यात आम्ही चॅम्पियन असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीरामुलू पुढे म्हणाले की, ट्यूशनमध्ये दररोज सर्वांसमोर त्यांचा अपमान केला जायचा. शिक्षक मूर्ख म्हणून देखील टोला मारायचे. दहावी पास झाल्याबद्दल आमचे शिक्षक आश्चर्य देखील व्यक्त करायचे. यानंतर श्रीरामुलू यांनी शिक्षकांना सांगितले की, कॉपी करूनच ते परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. याशिवाय मी या कॉपी करण्याच्या विषयात पीएचडी केली असल्याचे देखील मंत्री महोदयांनी शिक्षकांना सांगितले होते. 

अलीकडेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी देखील वादात सापडले होते. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते काँग्रेस नेते आणि माजी विधानसभा अध्यक्षांना शिवीगाळ करताना दिसत होते. काँग्रेसनेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, वाद वाढल्यानंतर कुमारस्वामी यांनी माफी देखील मागितली होती.

व्हिडीओमध्ये कुमारस्वामी ज्या काँग्रेस नेत्याला शिवीगाळ करताना दिसत होते, त्यांचे नाव केआर रमेश कुमार आहे. ते राज्यातील विधानसभेचे १६वे सभापती ठरले आहेत. कुमारस्वामी यांचा व्हिडीओ कर्नाटक काँग्रेसने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला आहे. पक्षाने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, "श्रीनिवासपूर विधानसभा मतदारसंघात कुमारस्वामी कारमध्ये बसलेले पाहायला मिळत आहेत. यादरम्यान ते माजी स्पीकर केआर रमेश कुमार यांना शिवीगाळ करत आहे." 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीministerमंत्रीStudentविद्यार्थी