शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडून ‘गधा मेहनत’; गाढविणीचे दूध विकून लाखोंची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 08:01 IST

एखाद्याला हिणवण्यासाठी ‘काय गाढव आहेस’ असे आपण सर्रास म्हणतो. पण, कर्नाटकात एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच चक्क गाढवांचा फार्म सुरू केला आहे.

बंटवाल (कर्नाटक) :

एखाद्याला हिणवण्यासाठी ‘काय गाढव आहेस’ असे आपण सर्रास म्हणतो. पण, कर्नाटकात एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वीच चक्क गाढवांचा फार्म सुरू केला आहे. ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी गाढवांच्या फार्ममधून दूध विकून ही व्यक्ती सध्या लाखो रुपयेदेखील कमावतेय.गाढवांची दुर्दशा न बघवल्याने डाँकी फार्म कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल येथे श्रीनिवास गौडा नावाच्या ४२ वर्षीय व्यक्तीने ८ जूनला गाढवांचे फार्म सुरू केले आहे. विशेष म्हणजे गाढवांची दुर्दशा न बघवल्याने डाँकी फार्म सुरू केल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. हे ‘डाँकी फार्म’ कर्नाटकातील पहिले आणि केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यानंतरचे देशातील दुसरे अशा प्रकारचे फार्म आहे. 

गाढवाचे दूध महाग, औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण : देशात गाढवांच्या प्रजातींची संख्या कमी होत आहे. आता धोबींच्या व्यवसायात कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आणि  इतर तंत्रे वापरली जात आहेत. त्यामुळे गाढवांचा वापर कमी झाला आहे. गाढवांचे फार्म सुरू करण्याची कल्पना मित्रांना सांगितली तेव्हा त्यांनीही खिल्ली उडविली. लोकांनी अनेक शंका उपस्थित केल्या;  पण गाढवाचे दूध चवदार, खूप महाग आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्णदेखील आहे. 

...म्हणून सुरू केले गाढवाचे फार्म बी.ए. पदवीधर असलेल्या गौडा यांनी २०२० मध्ये सॉफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडली आणि इरा गावात २.३ एकर जागेवर कृषी, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण आणि चारा विकासासाठी एकात्मिक केंद्र सुरू केले. त्यांनी सर्वप्रथम शेतात शेळीपालन सुरू केले. यासोबतच त्यांच्या शेतात ससे आणि कडकनाथ कोंबड्या आहेत. ते म्हणाले की, आता २० गाढवांसह गाढव फार्म सुरू करण्यात आले आहे. 

मिळाली १७ लाख रुपयांची ऑर्डर - लोकांना पॅकेटमध्ये गाढवाचे दूध पुरविण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. ३० मिली दुधाच्या पॅकेटची किंमत १५० रुपये असेल आणि ते मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये पुरविले जाईल, असे ते म्हणाले. - सौंदर्य उत्पादनांसाठीही हे दूध विकण्याची त्यांची योजना आहे.  या दुधासाठी १७ लाख रुपयांच्या ऑर्डर आधीच मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. 

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी