शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जेडीएससोबत थर्ड क्लास नागरिकासारखा व्यवहार करू नका, कुमारस्वामींचा काँग्रेसला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 19:59 IST

भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कर्नाटकमध्ये सत्तेसाठीचे राजकीय नाटक पुन्हा एकदा रंग भरू लागले आहे. तर दुसरीकडे आघाडी करून सत्तेवर असलेल्या जेडीएस आणि काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे आघाडी करून सत्तेवर असलेल्या जेडीएस आणि काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहेकाँग्रेसने जेडीएससोबत थर्ड क्लास श्रेणीतील नागरिकांसारखा व्यवहार करू नयेआगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकमधील जागावाटपावरून सध्या जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसमध्या खडाखडी

बंगळुरू - भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कर्नाटकमध्ये सत्तेसाठीचे राजकीय नाटक पुन्हा एकदा रंग भरू लागले आहे. तर दुसरीकडे आघाडी करून सत्तेवर असलेल्या जेडीएस आणि काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. काँग्रेसने आमच्या पक्षासोबत थर्ड क्लास श्रेणीतील नागरिकांसारखा व्यवहार करू नये, असा इशारा आज मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकमधील जागावाटपावरून सध्या जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसमध्या खडाखडी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कुमारस्वानी यांनी भाजपाविरोधात एकजुटीने लढण्यासाठी दोन्ही पक्षांना वाटाघाटींचे धोरण स्वीकारावे लागेल, असे म्हटले आहे.   कुमारस्वामी म्हणाले, ''काँग्रेसने आम्हाला सन्मानाने वागवले पाहिजे. त्यांनी आमच्यासोबत तृतीय श्रेणीतील नागरिकांप्रमाणे व्यवहार करू नये. इथे देवाण घेवाणीचे धोरण स्वीकारले पाहिजे.'' कर्नाटकमधील लोकसभेच्या जागावाटपामध्ये जनता दल सेक्युलरने 28 जागांपैकी 12 जागांची मागणी केली आहे. मात्र काँग्रेसने त्याला आक्षेप घेतला आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 17, काँग्रेसने 9 आणि जेडीएसने दोन जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस आणि जेडीएससाठी अग्निपरीक्षेसारखी असणार आहे. कारण जेडीएसने जुना म्हैसूर भागातील जागांची मागणी केली आहे. येथील वोक्कालिग समुदायामध्ये जेडीएसचा प्रभाव आहे. मात्र येथील बहुतांश जागांवर काँग्रेसचे खासदार असल्याने काँग्रेसचे नेते या जागा सोडण्यास नकार देत आहेत.  

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेसKarnatak Politicsकर्नाटक राजकारण