शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’ होणार, काँग्रेसचे सरकार कोसळणार; माजी मुख्यमंत्र्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 16:09 IST

'काँग्रेसचा मंत्री 50 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार.'

Karnataka Politics: एकीकडे काँग्रेसने तेलंगणात सत्ता काबीज केली, तर दुसरीकडे काँग्रेसशासितकर्नाटक राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलर (JDS) नेते एचडी कुमारस्वामी यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकार फार काळ टिकणार नसून ते लवकरच पडेल. राज्यातील एक मोठा मंत्री 50 हून अधिक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. 

काँग्रेसचा मंत्री भाजपात जाणारमाजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी रविवारी हसनमध्ये मीडियाशी बोलताना दावा केला की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कधीही पडेल. काँग्रेसमधील वरिष्ठ मंत्र्याला त्यांच्यावरील खटल्यातून सुटायचे आहे, त्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी चर्चा करत आहेत. हे मंत्री 50 ते 60 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. सध्या भाजप नेत्यांशी चर्चा सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.

सरकारमध्ये काहीच ठीक नाहीकुमारस्वामी पुढे म्हणाले की, राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये काहीच ठीक सुरू नाहीय. हे सरकार कधी पडेल माहीत नाही, पण एक मंत्री आपल्यावरील खटले टाळण्यासाठी भाजपसोबत हातमिळवणी करण्यास इच्छूक आहे. कुमारस्वामींना त्या नेत्याचे नाव विचारले असता ते म्हणाले की, छोट्या नेत्यांकडून अशी 'धाडसी' पावले उचलण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. अशा गोष्टी फक्त ‘प्रभावशाली नेता’च करू शकतो. लोकसभा निवडणुकीनंतर काहीही होऊ शकते, असा अंदाज जेडीएस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. 

कोणताही नेता प्रामाणिक नसतो जेडीएस नेते कुमारस्वामी पुढे म्हणतात, सध्याचे राजकीय वातावरण पाहता काहीही होऊ शकते. महाराष्ट्रासारकी परिस्थिती कर्नाटकात घडू शकते. कोणताही नेता पक्षाशी प्रामाणिक किंवा बांधील राहिलेला नाही. प्रत्येकजण त्यांचे वैयक्तिक फायदे पाहतात. राजकारणात हे नेहमीच घडले आहे. जेव्हा एखादा राजकारणी त्याच्या सोयीसाठी पक्ष बदलतो तेव्हा विचारधारा मागे राहते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा