शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka News:‘ज्या दिवशी मंदिरात गेलो होतो, त्या दिवशी मांस खाल्ले नव्हते’, सिद्धरामय्यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 19:44 IST

Karnataka News: 'हिंमत असेल तर डुकराचे मांस खाऊन मशिदीत जाऊन दाखवा.'- भाजपचे आव्हान

Siddaramaiah temple Visit:कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे. कोडागुच्या मंदिरात जाण्यापूर्वी सिद्धरामय्या यांनी मांसाहार केल्याचा आरोप भाजपने केला आहे. आमदार बोपय्या यांनी आरोप केला की, सिद्धरामय्या यांनी मडिकेरी येथे मांसाहार केल्यानंतर कोडालीपेट येथील पवित्र बसवेश्वर मंदिरात गेले. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे हे कृत्य असल्याचे ते म्हणाले. 

सिद्धरामय्यांचे स्पष्टीकरण18 ऑगस्ट रोजी कोडागुच्या दौऱ्यात कथितपणे मांसाहार केल्यानंतर सिद्धरामय्या कोडिलीपेट येथील बसवेश्वर मंदिरात गेल्याचा आरोप आहे. वाद वाढत असल्याचे पाहून सिद्धरामय्या यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ज्या दिवशी मंदिरात गेले, त्या दिवशी मांस खाल्ले नसल्याचे ते म्हणाले. मंगळवारी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 'त्या दिवशी मांस खाल्ले नव्हते. या मुद्द्याला "नॉन-इश्यू" म्हणत सिद्धरामय्यांनी त्यांच्या आवडीचे जेवण खाण्याच्या अधिकारावर भर दिला. 

मांस खाण्यात चुकी काय?'मांस खाणे हा इतका मोठा मुद्दा आहे का? काय खायचे, ही माझी वैयक्तिक गोष्ट आहे. मी मांसाहार आणि शाकाहारी दोन्ही पदार्थ खातो. काही लोक मांस खात नाहीत, ही त्यांची खाण्याची सवय आहे. माझ्या मते हा इतका मोठा मुद्दा नाही. बरेच लोक मांसाहार न करता मंदिरात जातात आणि बरेच लोक मांस खाऊन मंदिरात जातात. अनेक ठिकाणी देवी-देवतांना मांस अर्पण केले जाते. पण, मी त्या दिवशी मांस खाल्ले नव्हते,' असंही ते म्हणाले. 

...तर डुकराचे मांस खाऊन मशिदीत जा?'देवळात जाण्यापूर्वी काय खावे आणि काय खाऊ नये, असे देवाने सांगितले आहे का?' असा प्रश्न सिद्धरमय्यांनी उपस्थित केला होता. त्यावर, सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यांनी त्यांना आव्हान दिले की, 'सिद्धरामय्या, हिंमत असेल तर डुकराचे मांस खाऊन मशिदीत जाऊन दाखवा.' या आव्हानावर सिद्धरामय्या म्हणाले, 'मी फक्त चिकन आणि मटण खातो, इतर मांस खात नाही. पण मी ते खाणार्‍यांच्या विरोधात नाही, कारण ती त्यांची खाण्याची सवय आहे.'  

टॅग्स :Karnatakकर्नाटकsiddaramaiahसिद्धरामय्याTempleमंदिरBJPभाजपा