शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Sex CD Scandal : आक्षेपार्ह सीडी प्रकरण भाजपाच्या मंत्र्याला भोवलं; रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 14:36 IST

Karnataka Sex CD Scandal And Ramesh Jarkiholi : आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये एका आक्षेपार्ह सीडी प्रकरणावरून (Karnataka Sex CD Scandal) मोठी खळबळ उडाली आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्याभाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यांने ही सीडी जारी केली आहे, यामध्ये रमेश जारकीहोळी कथितरित्या एका तरुणीसोबत दिसून येत आहेत. दरम्यान, याबाबत राजकीय षड्यंत्र असल्याचे रमेश जारकीहोळी यांनी म्हटलं आहे. मात्र आता भाजपाच्या मंत्र्याला हे आक्षेपार्ह सीडी प्रकरण भोवलं असून रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहितीनुसार, जारकीहोळी यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याकडे सोपवला आहे. 

नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे सीडी प्रकरण मीडियासमोर आणले आहे. तसेच, दिनेश कलहळ्ली यांनी रमेश जारकीहोळी यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. रमेश जारकीहोळी यांनी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे. ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड (KPTCL) मध्ये तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून शारिरिक संबंध ठेण्यास सांगितल्याचा आरोप दिनेश कलहळ्ळी यांनी केला आहे.यासंदर्भात दिनेश कलहळ्ळी यांनी रमेश जारकीहोळी यांची एक सीडी व्हायरल केली आहे. यामध्ये रमेश जारकीहोळी हे एका तरुणीला शरीरसंबंध ठेवण्याबाबत बोलत असल्याचा दावा केला आहे.

संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी आपल्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांत तक्रार केली, असे दिनेश कलहळ्ळी यांनी म्हटले आहे. बंगळुरुचे पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तातडीने तपास करावा आणि पीडित तरुणीला  आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी दिनेश कलहळ्ळी यांनी केली आहे.

राजकीय षड्यंत्र - रमेश जारकीहोळी

दरम्यान, याबाबत भाष्य करताना रमेश जारकीहोळी यांनी हे राजकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. " याबाबात माझ्याजवळ एकच उत्तर आहे, हे राजकीय षड्यंत्र आहे. हे खोटे आहे. याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे", असे रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाYeddyurappaयेडियुरप्पा