शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

कर्नाटकात हनुमान चालिसा लावल्याने तरुणावर हल्ला; पीएम मोदींची काँग्रेसवर टीका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 18:52 IST

'काँग्रेसची विचारसरणी तुष्टीकरणाची, व्होट बँकेच्या राजकारणासाठी एससी/एसटी आणि ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला.'

Karnataka Lok Sabha Election : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये हनुमान चालिसा लावल्यामुळे एका दुकानदाराला काही मुस्लिम तरुणांकडून बेदम मारहाण झाली होती. त्या दिवसापासून हे प्रकरण भाजपने चांगलेच उचलून धरले असून, राज्यातील सत्ताधारी काँग्रेसवर भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. आता हे प्रकरण मंगळवारी(दि.23) पुन्हा एकदा चर्चेत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी या वादाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. 

राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूर येथे आयोजित एका निवडणूक रॅलीत बोलताना पीएम मोदी म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेस राजवटीत एका दुकानदाराला हनुमान चालीसा लावल्यामुळे मारहाण करण्यात आली. काँग्रेसच्या राजवटीत हनुमान चालीसा ऐकणेही गुन्हा आहे. 

मोदी पुढे म्हणतात, काँग्रेसची विचारसरणी नेहमीच तुष्टीकरणाची राहिली आहे. 2004 मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच त्यांनी आंध्र प्रदेशातील एससी/एसटीचे आरक्षण कमी करुन मुस्लिमांना देण्याचे काम केले. 2011 मध्ये काँग्रेसने संपूर्ण देशात याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने व्होट बँकेच्या राजकारणासाठी एससी/एसटी आणि ओबीसींना दिलेले हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. 

परवा मी देशासमोर सत्य मांडले होते की, काँग्रेस तुमची संपत्ती हिसकावून आपल्या खास लोकांना वाटण्याचा कट रचत आहे. काँग्रेसचे व्होट बँक आणि तुष्टीकरणाचे राजकारण मी उघड केले. काँग्रेसने सत्तेत असताना दलित आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाशी छेडछाड केली. बाबासाहेबांनी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना दिलेला आरक्षणाचा अधिकार काँग्रेसला धर्माच्या आधारावर मुस्लिमांना द्यायचा होता. मी तुम्हाला गॅरंटी देतो की, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण संपणार नाही आणि धर्माच्या नावावर फूट पडू देणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.

कर्नाटकात काय घडले?7 मार्च 2024 रोजी बंगळुरू येथे काही तरुणांनी हनुमान चालिसा लावल्यामुळे एका दुकानदारावर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या घटनेनंतर पीडित मुकेशने त्याच्याच परिसरातील सुलेमान, शाहनवाज, दानिश यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाने कर्नाटकात मोठा गदारोळ झाला. दुसऱ्या दिवशी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी पीडित दुकानदाराची भेट घेतली आणि राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली.

टॅग्स :karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४