कर्नाटक विधानसभेचे उपसभापती, सौन्दतीचे आमदार आनंद मामनी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 14:39 IST2022-10-23T14:39:10+5:302022-10-23T14:39:37+5:30
अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी दाखल झाले आहेत.

कर्नाटक विधानसभेचे उपसभापती, सौन्दतीचे आमदार आनंद मामनी यांचे निधन
चिकोडी : कर्नाटक विधानसभेचे उपसभापती , सौन्दतीचे आमदार आनंद मामनी (वय 56) यांचे निधन झाले. मागील काही दिवसापासून गंभीर आजाराने त्रस्त असलेले आनंद मामनी हे बेंगळुरू येथील मनिपाल या खासगी इस्पितळात उपचार घेत होते. शनिवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योती मालवली.
आज सकाळी त्यांचे पार्थिव शरीर बेळगावला आणण्यात आले असून दुपारी त्यांच्यावर सौन्दती येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी दाखल झाले आहेत. मागील काही महिन्यापासून लिव्हरच्या समस्येने त्रस्त आनंद मामनी चेन्नईत उपचार घेत होते. अलीकडेच त्याना बेंगळुरूच्या मनिपाल इस्पितळात हलविण्यात आले होते. अलिकडेच त्यानी आपली प्रकृती सुधारत असून लवकरच परत मतदारसंघात येणार असल्याचा व्हिडीओ करून कार्यकर्त्यांना न घाबरण्याचे आवाहन एका व्हिडीओ द्वारे केले होते.
शनिवार त्यानी अखेरचा श्वास घेतला. 18 जानेवारी 1966 साली जन्मलेल्या आनंद मामनी यांच्य पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सौन्दती मतदारसंघात सलग तीनवेळा ते आमदार म्हणून निवडून गेले होते. ते अजातशत्रू होते. ते बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, सौन्दती यल्लम्मा देवस्थान कमिटीचे संचालकपदावर कार्यरत होते. विकासकामांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचे नावलौकिक केले होते. त्यांची वडील चंद्रशेखर मामनी हे देखिल विधाननसभेचे सभापती होते.