शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

Heart Attack Deaths: या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:06 IST

Karnataka Herat Attack News: गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Karnataka Herat Attack News: गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. कर्नाटक सरकारने तर या घटना रोखण्यासाठी 'पुनीत राजकुमार हृदय ज्योती' योजना सुरू केली आहे. परंतु, राज्यात हृदयविकाराच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. अशातच, येथील  हसन जिल्ह्यात गेल्या महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने १८ तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश मृतांचे वय १८-४० दरम्यान होते. राज्य सरकारने या घटनांना गांभीर्याने घेतले असून, कर्नाटकचेआरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी हसन जिल्ह्यात हृदयविकाराच्या वाढत्या घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ञांकडून अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य मंत्री काय म्हणाले?सोमवारी एक्स वर पोस्ट करताना मंत्री म्हणाले की, आरोग्य विभागाने हसन जिल्ह्यात एका महिन्यात नोंदवलेल्या हृदयविकाराच्या १८ प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली आहे. मी विभागाच्या अधिकाऱ्यांना 'जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्च'च्या संचालकांच्या नेतृत्वाखाली हृदयविकाराच्या वाढत्या प्रकरणांची तज्ञांकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

'पुनीत राजकुमार हृदय ज्योती' योजना सुरूराज्य सरकारने हृदयविकाराच्या घटना रोखण्यासाठी 'पुनीत राजकुमार हृदय ज्योती' योजना सुरू केली आहे. परंतु, अलिकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांवर सखोल संशोधन करण्याची गरज आहे. बदलती जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि असंसर्गजन्य आजार हे हृदयविकाराचे कारण मानले जात असले तरी, हासनमध्ये नोंदवलेल्या घटनांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी, तज्ञांच्या पथकाला संशोधन करून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हृदयविकाराची लक्षणेहृदयविकाराचा झटका, ज्याला वैद्यकीय भाषेत मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात, तो हृदयाच्या स्नायूंना रक्त वाहून नेणाऱ्या धमन्यांमध्ये (कोरोनरी आर्टरीज) अडथळा आल्यामुळे येतो. हा अडथळा सहसा कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे किंवा रक्ताच्या गुठळ्यांमुळे होतो. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा तो भाग हळूहळू खराब होऊ शकतो. हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये छातीत दाब किंवा वेदना, हात, जबडा, पाठ किंवा मान दुखणे, धाप लागणे, घाम येणे, चक्कर येणे आणि मळमळ होणे यांचा समावेश आहे. वेळेवर उपचार न केल्यास ते घातक ठरू शकते. 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाKarnatakकर्नाटकHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHeart Diseaseहृदयरोग