शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Breaking: कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळलं; बहुमत चाचणीत नापास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 20:00 IST

कर्नाटकमध्ये जेडीएस, काँग्रेसला मोठा धक्का

बंगळुरु: कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं आहे. विधानसभेत घेण्यात आलेल्या बहुमत चाचणीत कुमारस्वामी यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. यामुळे काँग्रेस, जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी काही दिवसांपूर्वींच राजीनामा दिला होता. त्यानंतर कर्नाटकी नाट्य सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलं. यानंतर अखेर आज कर्नाटकच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात कुमारस्वामींना मोठा धक्का बसला. आता यापुढे कर्नाटकात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.कर्नाटक विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. यात काँग्रेस, जेडीएसच्या बाजूनं ९९ आमदारांनी मतदान केलं. तर १०५ मतं सरकारच्या विरोधात गेली. त्यामुळे आता कुमारस्वामींना सत्ता सोडावी लागेल. त्याआधी कुमारस्वामींनी राज्यातील जनतेची माफी मागितली. 'विश्वासदर्शक ठराव पुढे ढकलण्यात मला रस नाही. मी अपघातानं मुख्यमंत्री झालो. मी चांगलं काम करण्यासाठी आलो होतो. काँग्रेस-जेडीएस हे दोन पक्ष उत्तम प्रशासन देण्यासाठी एकत्र आले होते,' असं भावूक भाषण कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडण्याआधी केलं.चौदा महिन्यांपूर्वी काँग्रेस, जेडीएसनं कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन केली होती. विशेष म्हणजे भाजपा क्रमांक एकचा पक्ष असतानाही काँग्रेस, जेडीएसनं आघाडी करत सत्ता मिळवली. मात्र हे सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात होतं. लोकसभा निवडणुकीनंतर कर्नाटकात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी राजीनामे दिल्यानं सरकार अडचणीत आलं. यानंतर आज कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यावेळी सदनात २०४ आमदार उपस्थित होते. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस