शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Exit Poll 2023: कर्नाटकात भाजपला विजयी करत आहेत 'हे' दोन एक्झिट पोल, इतरांनी दाखवला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 22:46 IST

या दोहोंच्या सर्वेक्षणात कर्नाटकात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष, तर भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कर्नाटकातील सर्वच्या सर्व 224 जागांसाठी आज (बुधवारी) मतदान पार पडले. यानंतर एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. बहुतांश जागांवर काँग्रेस आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर दिसत आहे. कर्नाटकमध्ये या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे, मात्र तो बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे. तर, दोन एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. "न्यूज नेशन-सीजीएस आणि एशियानेट न्यूज-जन की बात" या दोहोंच्या सर्वेक्षणात कर्नाटकात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष, तर भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोलनुसार, भाजपला 114 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 86 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात जेडीएसला 21 आणि इतरांना तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात बहुमताचा आकडा 113 असून भाजपला 114 जागा मिळणे अपेक्षित आहे. असे झाल्यास भाजपला कर्नाटकात आपले सरकार कायम ठेव्यात यश येईल.

न्यूज नेशन-सीजीएस एक्झिट पोल -बीजेपी - 114काँग्रेस - 86 जेडीएस - 21 इतर - 3

याच बरोबर, एशियानेट न्यूज-जन की बातच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला येथे 94-117 जागा मिळू शकतात. तसेच, काँग्रेसला 91-106 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, जेडीएसला 14-24 जागा मिळू शकतात. तर इतरांना शून्य ते दोन जागा मिळणे अपेक्षा आहे.

एशियानेट न्यूज-जन की बातचा एक्झिट पोल -बीजेपी - 94-117 काँग्रेस - 91-106 जेडीएस - 14-24 इतर - 0-2

इतर एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीवर - बहुतांश एक्झिट पोलमध्ये कर्नाटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'झी न्यूज' आणि 'मॅट्रिक्स'च्या एक्झिट पोलनुसार, 41 टक्के मतांसह काँग्रेसला 103 ते 118 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भारतीय जनता पक्षाला 36 टक्के मतांसह 79 ते 94 जागा मिळण्याची शक्यता वरतवली गेली आहे. यासिवाय, जनता दल (सेक्युलर)ला 25 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे.

तसेच, 'TV9' आणि 'पोलस्ट्रॅट'ने केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसला 99 ते 109 जागा मिळू शकतात, तर भाजपला 88 ते 98 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच, JD(S) ला 21 ते 26 जागा मिळू शकतात. याशिवाय, 'एबीपी न्यूज' आणि 'सी-व्होटर'च्या एक्झिट पोलने काँग्रेसला 100 ते 112 जागा, भाजपला 83 ते 95 आणि जेडीएसला 21 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस