शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Karnataka Elections 2023: बेळगाव जिल्ह्यात 5 वाजेपर्यंत 66.37 टक्के मतदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 17:42 IST

प्रकाश बेळगोजी बेळगाव : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज, बुधवारी सकाळी 7 वाजता सुरुवात ...

प्रकाश बेळगोजीबेळगाव : देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज, बुधवारी सकाळी 7 वाजता सुरुवात झाली आहे. प्रारंभीच्या सत्रात मतदारांचा फारसा प्रतिसाद नसलेल्या दिसून आले. मात्र त्यानंतर मतदानासाठी मतदारांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात 53 टक्के मतदानाची नोंद झाली. तर, 5 वाजेपर्यंत 66.37 टक्के मतदान झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत पहिल्या सत्रात राज्यात एकूण 8.26 टक्के तर बेळगाव जिल्ह्यात 7.47 टक्के तसेच दुसऱ्या टप्प्यात 22.42 टक्के मतदानाची नोंद झाली होती.मतदान शांततेने सुरळीत पार पडावे यासाठी प्रत्येक मतदार केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रारंभी सकाळी काही अपवाद वगळता उर्वरित सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदानासाठी फारशी गर्दी झाली नव्हती. मात्र, 9 नंतर प्रत्येक मतदार केंद्रांवर मतदारांची गर्दी होऊन मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. पहिल्या टप्प्यात सौंदत्ती -यल्लमा मतदारसंघात सर्वाधिक मतदान भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने सकाळी 9:22 वाजता जाहीर केलेल्या जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान टक्केवारीमध्ये सर्वाधिक मतदान सौंदत्ती -यल्लमा मतदारसंघात 11.03 टक्के इतके, तर सर्वात कमी मतदान रामदुर्गमध्ये 4.57 टक्के इतके झाले होते.काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलीआज सकाळी प्रारंभीच्या सत्रात शहरातील बऱ्याच मतदार संघामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कांही ठिकाणी ईव्हीएम मशीनची मतदान यंत्रणा बंद पडली होती. परिणामी सकाळी लवकर मतदान केंद्राच्या ठिकाणी हजर होऊन उत्साहाने कामाला लागलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांवर हताश होऊन वीज पुरवठा केंव्हा सुरू होतो याची वाट पाहण्याची वेळ आली होती. तथापि याबाबतची माहिती मिळताच निवडणूक आयोगाने तात्काळ कार्यवाही करत संबंधित मतदान केंद्रांवरील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू होईल याची व्यवस्था केली. एकंदर आज सकाळी 9 वाजल्यानंतर मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. गेल्या दोन-तीन दिवसापासून दुपारनंतर शहर परिसरात वळीवाची हजेरी लागत असल्यामुळे बऱ्याच मतदारांचा पाऊस येण्यापूर्वी मतदान उरकण्याकडे कल आहे. त्यामुळे आज दुपारी 1 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा जाणकारांचा अंदाज आहे.सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघामधील सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. निपाणी 6.2 टक्के, चिकोडी -सदलगा 7.72 टक्के, अथणी 9.06 टक्के, कागवाड 8.7 टक्के, कुडची 10.54 टक्के, रायबाग  9.15 टक्के, हुक्केरी 7.17 टक्के, अरभावी 5.41 टक्के, गोकाक 7.94 टक्के, यमकनमर्डी 7.68 टक्के, बेळगाव उत्तर 7.18 टक्के, बेळगाव दक्षिण 5.57 टक्के, बेळगाव ग्रामीण 6.06 टक्के, खानापूर 7.16 टक्के, कित्तूर 6.12 टक्के, बैलहोंगल 6.6 टक्के, सौंदत्ती यल्लमा 11.03 टक्के आणि रामदुर्ग 4.57 टक्के.

दुपारी 3 वाजेपर्यंत  जिल्ह्यात 53 टक्के मतदान बेळगाव ग्रामीण -53.25%, बेळगाव दक्षिण -45.97%, बेळगाव उत्तर -44.18%, खानापूर -53.19

सायंकाळी पाच पर्यंत 66.37 टक्के मतदान बेळगाव ग्रामीण 68.07%, बेळगाव दक्षिण 57.06%, बेळगाव उत्तर  55.52%, खानापूर  65.02%

काँग्रेस विरुद्ध भाजप लढत जिल्ह्यातील 18 पैकी कांही मतदार संघात थेट काँग्रेस विरुद्ध भाजप लढत आहे, तर कांही मतदारसंघांमध्ये प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष यांच्यात कडवी झुंज होईल असा अंदाज आहे. दुसरीकडे बेळगाव आणि खानापूर तालुक्यात राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसमोर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकVotingमतदानBJPभाजपाcongressकाँग्रेसbelgaonबेळगाव