Karnataka Elections : काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचक्षणी लोकशाहीची हत्या झाली- अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 12:57 PM2018-05-17T12:57:52+5:302018-05-17T12:58:32+5:30

काँग्रेस आणि भाजपा अध्यक्षांमध्ये ट्विटरवर जुंपली

Karnataka Elections 2018 amit shah responds rahul congress jds pact is murder of democracy | Karnataka Elections : काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचक्षणी लोकशाहीची हत्या झाली- अमित शाह

Karnataka Elections : काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचक्षणी लोकशाहीची हत्या झाली- अमित शाह

Next

बंगळुरु: कर्नाटकमध्ये जोरदार राजकीय नाटक सुरू आहे. पुरेसं संख्याबळ नसतानाही राज्यपालांनी भाजपाला कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केल्यानं काँग्रेस आणि जेडीएसचे नेत्यांनी विधानसभेबाहेर आंदोलन केलं. आज सकाळी भाजपा नेते येडियुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीवर राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवरुन केलेल्या शाब्दिक हल्ल्याला भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाकडून पोकळ विजयाचा जल्लोष सुरू असला, तरी देशभरात लोकशाहीचा पराभव झाल्याचं दु:ख आहे, अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी भाजपावर शरसंधान साधलं होतं. 





राहुल गांधींच्या या टीकेला अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. 'ज्यावेळी काँग्रेस पक्षानं संधीसाधूपणा करुन जेडीएसला पाठिंबा दिला, त्याचवेळी लोकशाहीची हत्या झाली,' अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर हल्लाबोल केला. 'राहुल गांधींच्या पक्षानं कर्नाटकच्या कल्याणासाठी नव्हे, तर स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी जेडीएसला पाठिंबा दिला,' असा प्रतिहल्लादेखील शाहांनी केला. 





अमित शाह यांनी दुसऱ्या एका ट्विटमधून राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षाचा इतिहासदेखील सांगितला. 'काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाचा गौरवशाली इतिहास माहित नसावा. आणीबाणी, कलम 356 चा दुरुपयोग, न्यायालयं, प्रसारमाध्यमांना दुबळं करणं, हाच काँग्रेसचा इतिहास आहे,' अशा शब्दांमध्ये अमित शाह यांनी राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर उत्तर दिलं. आता अमित शाह यांच्या टीकेला राहुल गांधींकडून काय उत्तर दिलं जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Web Title: Karnataka Elections 2018 amit shah responds rahul congress jds pact is murder of democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.