शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
2
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, भारत सरकारची मोठी घोषणा
3
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
4
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
5
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
6
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
7
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
8
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
9
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
10
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
11
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
12
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
13
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
14
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
15
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
16
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
18
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
20
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?

Karnataka Election Result: कर्नाटकमध्ये काँग्रेस निर्विवाद बहुमताकडे, तरीही बुक केल्या ५० खोल्या, स्पष्टीकरण देताना नेते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 13:52 IST

Karnataka Election Result Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसला बहुमताहूनही अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र असं असतानाही पक्ष सावधपणे पावलं उचलत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. काँग्रेसला बहुमताहूनही अधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र असं असतानाही पक्ष सावधपणे पावलं उचलत आहे. पक्षाला फोडाफोडीच्या राजकारणाची चिंता काँग्रेसला वाटत असून पक्षाने त्यादृष्टीने खबरदारीची पावलं उचलली आहेत. काँग्रेसने आपल्या विजयी उमेदवारांना ठेवण्यासाठी हैदराबादमध्ये एका फाईव्ह स्टार रिसॉर्टमध्ये ५० खोल्या बुक केल्या आहेत. काँग्रेस नेते बी.के. हरिप्रसाद यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच भाजपाच्या ऑपरेशन लोट्सपासून वाचण्यासाठी ही पावलं उचलल्याचे पक्षाने सांगितले आहे. हरिप्रसाद यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक केला आहे. कारण भाजपा ऑपरेशन लोट्स राबवू शकते.

भाजपाच्या एका नेत्याने प्लॅन बी तयार आहे, असंही सांगितलं आहे. भाजपाने दोन वेळा आमदार फोडून सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा तोडफोड करू शकते, ही भीती खरी आहे.

दरम्यान, बी. के. हरिप्रसाद यांनी कर्नाटकमधील विजयाचं कारणंही सांगितलं. ते म्हणाले, राहुल गांधी यांचं सदस्यत्व जाणं हा कर्नाटकच्या निवडणुकीत निर्णायक मुद्दा ठरला. कर्नाटकच्या लोकांना मुर्ख बनवता येणार नाही. बजरंगबली आणि बजरंग दल यांच्यातील फरक लोकांना समजतो. बजरंग बल आमचे दैवत आहेत. तर बजरंग दलाकडे लोक एक राजकीय संघटन म्हणून पाहतात. त्यामुळे खूप मोठा फरक पडला नाही. किनारी भागात त्याचा थोडासा परिणाम जाणवला.

कर्नाटकमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये काँग्रेसने १३४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा केवळ ६४ जागांवर आघाडीवर आहे. जे़डीएस २२ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ४ जागांवर आघाडीवर आहेत. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस