शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election: कर्नाटकमध्ये काँग्रेसचं पारडं जड, बहुमत मिळणार की..., फायनल ओपिनियन पोलचे आकडे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 17:05 IST

Karnataka Assembly Election 2023: प्रचार संपायला आता काही अवधीच शिल्लक राहिला असताना कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील कल दर्शवणारे शेवटचे ओपिनियन पोल समोर आली आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात तीन प्रमुख पक्ष असले तरी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपामध्येच मुख्य चुरस दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेसकडूनभाजपा सरकारचा भ्रष्टाचार आणि जातियवादाच्या मुद्द्यांवरून आक्रमक प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपाने पंतप्रधान मोदींविरोधात खर्गेंनी केलेली टिप्पणी आणि बजरंग दलावर बंदी घालण्याचं काँग्रेसने दिलेलं आश्वासन यांना प्रमुख मुद्दा बनवलं आहे. दरम्यान, प्रचार संपायला आता काही अवधीच शिल्लक राहिला असताना कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील कल दर्शवणारे शेवटचे ओपिनियन पोल समोर आली आहेत.

सी-वोटरने केलेल्या या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकमध्ये अखेरच्या क्षणी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे. या ओपिनियन पोलनुसार २२४ जागा असलेल्या कर्नाटकच्या विधानसभेमध्ये काँग्रेसला ११० ते १२२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर भाजपाला ७३ ते ८५ जागांवर समाधान मानावे लागू शकते. जेडीएसला २१ ते २९ आणि इतरांना २ ते ४ जागा मिळू शकतात.

कर्नाटकमधील विभागवार आकडेवारी पाहिल्यास ग्रेटर बंगळुरूमधील ३२ जागांपैकी काँग्रेसला १४ ते १८, भाजपाला १२ ते १६, जेडीएसला १ ते ४ आणि इतरांना ० ते १ जागा मिळू शकते. तर ओल्ड म्हैसूर भागात ५५ जागांपैकी काँग्रेसला २४ ते २८, जेडीएसला १९ ते २३, भाजपाला ४ ते ८ आणि इतरांना ० ते ३ जागा मिळू शकतात.

सेंट्रल कर्नाटकमधील ३५ जागांपैकी भाजपाला १० ते १४, काँग्रेसला २० ते २४, जेडीएसला ० ते २ आणि इतरांच्या खात्यात ० ते १ जाग जाऊ शकते. तर कोस्टल कर्नाटकमध्ये २१ जागांपैकी भाजपाला १३ ते १७, काँग्रेसला ४ ते ८ जागा मिळू शकतात.  हैदराबाद कर्नाटकमधील ३१ जागांपैकी भाजपाल ६ ते १०, काँग्रेसला १८ ते २२, जेडीएसला ० ते २ आणि इतरांना ० ते ३ जागा मिळू शकतात. तर मुंबई कर्नाटकमध्ये ५० जागांपैकी काँग्रेसला २४ ते २८, भाजपाला २२ ते २६, जेडीएसला ० ते १ आण इतरांच्या खात्यात ० ते १ जागा जाऊ शकते

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा