शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election 2018: सट्टाबाजारात भाजपाची हवा; जेडीएस किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 09:18 IST

भाजपाला सट्टाबाजारात सर्वाधिक पसंती मिळताना दिसतं आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला जनता दल सेक्युलरची मदत घ्यावी लागेल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. 

बंगळुरु: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सट्टाबाजारात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सत्ताबाजारात कोणाला कौल मिळणार, यावरुन सट्टाबाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे. भाजपाला सट्टाबाजारात सर्वाधिक पसंती मिळताना दिसतं आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला जनता दल सेक्युलरची मदत घ्यावी लागेल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोल्समधून भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, तरी त्यांच्याकडे बहुमत नसेल, असे एक्झिट पोलचे आकडे सांगतात. सट्टाबाजारातदेखील हाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. भाजपाला 96 ते 98 जागा मिळतील, तर काँग्रेस 85 ते 87 जागांवर विजयी होईल, असा सट्टाबाजाराचा अंदाज आहे. अशा प्रकारे लावला जातो सट्टाएक-वर-एक ट्रेडनुसार, जर एखाद्या व्यक्तीनं भाजपावर 1 लाखाचा सट्टा लावला आणि पक्षाला 98 किंवा त्याहून जास्त जागा मिळाल्या, तर त्या व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. 'भाजपावर सर्वाधिक सट्टा लावला जात आहे. निवडणूक प्रचार संपताच सट्टेबाजांनी जोखीम पत्करण्यास सुरुवात करत कोट्यवधी रुपये लावले जात आहेत,' असं एका सट्टेबाजानं सांगितलं. कर्नाटकमध्ये भाजपा सत्ता स्थापन करेल, असं सट्टेबाजांना वाटतं. मात्र त्यासाठी भाजपाला तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाची गरज लागेल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जनता जल सेक्युलर हा पक्ष 32 ते 35 जागा मिळवून किंगमेकर ठरेल, असा सट्टाबाजाराचा अंदाज सांगतो. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस