शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचा सफाया होतोय- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 13:31 IST

कर्नाटकमध्ये मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

बंगळुरू: काँग्रेसमुळे कर्नाटकमधील जनतेची पाच वर्षे वाया गेली. मात्र यापुढे असं होणार नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर तोफ डागली. देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचा सफाया होतोय. जिथे पाहाल तिथे काँग्रेसचा धुव्वा उडतोय, असंही मोदींनी यावेळी म्हटलं. ते कलबुर्गीतील एका जनसभेला संबोधित करत होते. पंतप्रधान मोदींनी स्थानिक भाषेत त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. 'निवडणुका येत-जात राहतात. मात्र इतक्या मोठा जनसागर कधीकधीच पाहायला मिळतो. कर्नाटकमधील जनता यापुढे काँग्रेस सरकारला सहन करणार नाहीत. काँग्रेसच्या राजवटीत कर्नाटकमधील जनतेची पाच वर्षे वाया गेली. मात्र यापुढे असं घडणार नाही,' असं मोदींनी म्हटलं. ही निवडणूक फक्त जिंकण्या-हरण्यापुरती मर्यादित नाही. ही निवडणूक तरुणांचं भविष्य ठरवणारी आहे, असं मोदी म्हणाले. 'कर्नाटकात आमचं सरकार आल्यास केंद्र आणि राज्य सरकार खांद्याला खांदा लावून विकासासाठी काम करेल,' अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. कलबुर्गीतील या सभेत बोलताना मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला. 'सरदार वल्लभभाई पटेल यांचं कर्नाटकशी खूप जवळचं नातं होतं. जेव्हा निजामानं सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला, त्यावेळी सरदार पटेल यांनी निजामाला गुडघे टेकायला लावले होते,' असं मोदी म्हणाले. यावरुन त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. 'सरदार पटेल यांचं नाव घेताच काँगेसमधील एका कुटुंबांची झोप उडते. पटेल यांचं तिरस्कार करणं काँग्रेसच्या स्वभावातच आहे,' अशा शब्दांमध्ये मोदी काँग्रेसवर बरसले.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस