शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election 2018 : अटीतटीच्या सामन्याचा मंगळवारी निकाल, कर्नाटकात सर्वत्र कडकोट बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 17:59 IST

कर्नाटक निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी आहे, दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे. सकाळपासून मतमोजणीस सुरुवात होणार असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस मंगळवारी सकाळी सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत कर्नाटकचा कौल कुणाला ते स्पष्ट होणार आहे. सामना अटीतटीचा असल्याने निकालाच्यावेळी काही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कमालीची दक्षता घेतली आहे. आजपासूनच कर्नाटकात सर्वत्र, त्यातही ३८ मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी होणार असलेल्या मतमोजणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र कर्नाटकात स्वाभाविकच या अटीतटीच्या सामन्याच्या निकालाकडे जरा जास्तच उत्सुकता आहे. कर्नाटकात ३८ मतमोजणी केंद्रावर मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यापैकी पाच मतमोजणी केंद्र ही बंगळुरुमध्ये आहेत. पोलिसांनी या सर्व मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. निवडणुकीच्या रिंगणातील सर्व उमेदवार, त्यांचे अधिकृत पासधारक एजंट आणि निवडणूक आयोगाच्या कर्मचारी-अधिकारी वर्गालाच मतमोजणी केंद्रांमध्ये प्रवेश असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी मतमोजणी केंद्र आणि परिसरात प्रवेश असणार नाही. या केंद्रांच्या परिसरात ठरवलेल्या जागेतच सामान्य नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. तेथेच ते थांबू शकतील. सोमवारी संध्याकाळपासूनच केंद्रांच्या परिसरात बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. 

मतमोजणी केंद्रांच्या सुरक्षेचे प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक किंवा उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निमलष्करी दल, राखीव पोलीस दलही कर्नाटक पोलिसांच्या मदतीला तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्ताचे प्रमुख असलेल्या प्रत्येक अधीक्षकाला आवश्यकता भासल्यास शीघ्र कृती दलाचा वापर करण्याचे अधिकार दएम्यात आले आहेत. निकालानंतर जल्लोष, मिरवणुकी काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी जारी करण्यात आलेले हे सर्व आदेश मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत जारी राहणार आहेत. 

कर्नाटकातील सीमाभागाचा समावेश असलेला मुंबई कर्नाटक, हैदराबाद कर्नाटक, मध्य कर्नाटक, कोस्टल कर्नाटक, म्हैसूर कर्नाटक, बंगळुरु कर्नाटक या सर्व विभागांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. अवघे ४० टक्के मतदान झालेल्या बंगळुरुचा अपवाद वगळता राज्यभरात सत्तरीचा टप्पा ओलांडला गेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अनपेक्षित निकालांचीही शक्यता आहे. त्यामुळेच निकालानंतर भलतं काही घड़ू नये यासाठी पोलिसांनी कमालीची खबरदारी घेतली आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८congressकाँग्रेसBJPभाजपाKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८