शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सत्तासंघर्ष : बंडखोरांच्या राजीनाम्यावर आज सर्वोच्च निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 09:55 IST

आज सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निकाल देणार आहे.  

नवी दिल्ली: कर्नाटकातील राजकीय नाट्यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या प्रकरणी मंगळवारी न्यायालयात दोन्ही पक्षकारांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निकाल देणार आहे.  विधानसभा अध्यक्ष राजीनामे स्वीकारत नसल्याचे कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तर सद्यस्थिती कायम ठेवण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडून करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देणार, याबद्दल मोठी उत्सुकता आहे. 

काल सर्वोच्च न्यायलयात आमदारांना राजीनामा देण्याचा मूलभूत अधिकार असल्याचे बंडखोर आमदारांचे वकील मुकूल रोहतगींनी सांगितले. केंद्र सरकारचे महाधिवक्ते राहिलेल्या रोहतगींनी बंडखोर आमदारांची बाजू न्यायालयात मांडली. आमदारांना राजीनामा देण्याचा अधिकार असल्याने त्यांना रोखले जाऊ शकत नाही. घटनात्मक व्यवस्थेनुसार आमदारांचे राजीनामे त्वरित स्वीकारायला हवेत, असा युक्तिवाद रोहतगींनी केला. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवींनी बाजू मांडली. राजीनाम्यावर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. जोपर्यंत अध्यक्ष निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करु शकत नाही, असे सिंघवींनी म्हटले. मुख्यमंत्री कुमारस्वामींच्या वतीने राजीव धवन यांनीदेखील अशाच प्रकारे युक्तिवाद केला. 

दरम्यान, उद्या कर्नाटकच्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्याआधी आज बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार आहे.  याप्रकरणी बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून राजीनामा स्वीकारत नसल्याचा युक्तिवाद बंडखोर आमदारांनी केला. तर आमदारांच्या राजीनाम्यावर बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी न्यायालयाला सांगितले आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKarnatak Politicsकर्नाटक राजकारण