शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 22:03 IST

राजीनाम्याचं पत्र आणि त्यावरील स्वाक्षरी खोटी असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

बंगळुरू: कर्नाटकमधील सत्तेचं नाटक सलग तिसऱ्या आठवड्यातही सुरूच आहे. विधानसभेत थोड्याच वेळात बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षात असलेल्या भाजपानं आजच बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या राजीनाम्याचं पत्र विधानसभेत त्यांच्याच टेबलवर दिसल्यानं एकच खळबळ उडाली. मात्र हे पत्र आणि त्यावरील स्वाक्षरी खोटी असल्याचं कुमारस्वामींनी सभागृहाला सांगितलं. कोणाला मुख्यमंत्रीपदी होण्याची इतकी घाई झाली आहे, असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना लक्ष्य केलं. कर्नाटकच्या विधानसभेत थोड्याच वेळात बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुमारस्वामींचं सरकार अडचणीत आलं आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र असल्याचं दिसत होतं. 'मी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारुन मला जबाबदारीतून मुक्त करावं,' असा मजकूर या पत्रात दिसत आहे. राज्यपालांना लिहिलेल्या या पत्रावर मुख्यमंत्री कुमारस्वामींची स्वाक्षरी आणि आजची तारीखदेखील आहे. त्यामुळे कुमारस्वामी राजीनामा देणार का, अशी चर्चा सुरू झाली. कुमारस्वामी यांच्या टेबलवरील राजीनाम्याचं पत्र समोर येताच मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. संबंधित पत्र बनावट असल्याचं त्यांच्या कार्यालयानं स्पष्ट केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देत थेट भाजपावर निशाणा साधला. 'मी राज्यपालांकडे राजीनामा देत असल्याची माहिती मला मिळाली. नेमकं कोण मुख्यमंत्री व्हायची वाट पाहतंय, याची मला कल्पना नाही. कोणीतरी माझी बनावट स्वाक्षरी करुन बोगस पत्र सोशल मीडियावर व्हायरल केलं. इतक्या खालच्या पातळीवरील राजकारण पाहून मला धक्का बसला,' अशा शब्दांमध्ये कुमारस्वामींनी भाजपावर टीका केली. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस