कौटुंबिक नात्यांना कलंकित करत एका महिलेसोबत तिचा पती आणि सासऱ्यानेच अत्यंत लाजिरवाणं कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील बंगळुरू येथील रहिवासी असलेल्या हलिमा सादिया नावाच्या या महिलेने तिचा पती आणि सासऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. सासरा आपल्याला दररोज शरीराला मालिश करायला लावायचा तर पती नेहमी राजकीय नेते आणि इतर प्रभावशाली व्यक्तींसोबत झोपण्यासाठी जबरदस्ती करायचा, असा आरोप या पीडितेने केला आहे. तसेच असं करण्यास नकार दिला तर पती बेदरम मरहाण करायचा. तसेच तीन तलाक द्यायचा. सासराही आपल्यावर वाईट नजर ठेवून होता, असेही या पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहेत की, माझ्या पतीने मला राजकारण्यांसह इतर प्रभावशाली लोकांसोबत शय्यासोबत करण्यास सांगून वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर माज्या मर्जीविरोधात जाऊन मला गर्भपात करायला लावला. एकता तर माझ्या पतीने मला धमकी देत माझ्यावर बंदूक रोखली, अशा आरोपही या महिलेने केला आहे.
पतीकडून गैरमार्गाला जाण्यासाठी होत असलेल्या जबरदस्तीपुरतंच या महिलेचं शोषण मर्यादित नव्हतं. तर तिचा सासरा आणि सासूही तिचा वारंवार छळ करत असत. सासरा तिला दररोज शरीराला मालीश करायला सांगायचा. तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा बाहाणा बनवून ही मंडळी त्यांच्यावर दबाव आणत असत.
एवढंच नाही तर सासरची मंडळी सातत्याने हुंड्याची मागणी करत असत. तसेच सातत्याने शारीरिक आणि मानसिकरीत्या छळ करायचे, असा आरोपही या महिलेने केला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत या महिलेने पुढे सांगितले की, तिचा पती नियमितपणे इतर महिलांसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत असे. तसेच मला इतर पुरुषांसोबत झोपण्यासाठी भाग पाडत असे. आता या प्रकरणी बनशंकरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.