शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दहावी नापास विद्यार्थ्याने अॅमेझॉनला घातला 1.3 कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 17:36 IST

21 स्मार्टफोन, एक लॅपटॉप, आयपॉड, अॅपल घड्याळाचा समावेश आहे.

बंगळुरु - दहावीमध्ये शिक्षण सोडलेल्या एका तरुणाने अॅमेझॉनला 1.3 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. बंगळुरुत रहाणारा हा तरुण एकदंत कुरिअर कंपनीमध्ये काम करत होता.  ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनकडून देण्यात आलेल्या टॅबद्वारे त्यानं हा घोटाळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

25 वर्षीय दर्शन एलियास ध्रुवने आपल्या मित्रांना अॅमेझॉनवरुन महागड्या वस्तू ऑर्डर करायला सागंत असे. त्यानंतर  त्या वस्तू पैसे ट्रांसफर न करता त्यांना पोहचवत असे. या घटनेबाबत चार तरुणांना 25 लाखांच्या सामनासह पोलिसांनी ताब्यत घेतले आहे. यामध्ये 21 स्मार्टफोन, एक लॅपटॉप, आयपॉड, अॅपल घड्याळाचा समावेश आहे. या सर्वसामानासोबतच चार महागड्या दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  दोन जण अद्याप फरार आहेत. 

काय म्हणाले पोलिस - हा फसवणूकीचा प्रकार सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीमध्ये झाला आहे. तीन महिन्यांच्या डाटाची पडताळणी करताना अॅमेझॉनच्या आधिकाऱ्यांना दर्शनने केलेली फसवणूक समजली. त्यानंतर अॅमेझॉनने पोलिसांत त्याची तक्रार दाखल केली.  सप्टेंबर 2017 ते फेब्रुवारी 2018 या सहा महिन्यांत अॅमेझॉनला चिकमंगळुरु शहरातून 4,604 ऑर्डर्स मिळाल्या होत्या. ही सर्व उत्पादने दर्शनने पोहचवली. एकदंत कुरिअर कंपनी आणि अॅमेझॉन यांच्यामध्ये भागीदारी होती,  दर्शन एकदंत कुरिअर कंपनीमध्य काम करत होता. हे प्रकरण आणखी पूर्णपण स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, दर्शनने कस्टमर्स पैसे भरत असलेल्या सिस्टममध्ये छेडछाड केली आहे. एसपी के. अन्नामलई यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, कार्ड स्वॉप करताना डुप्लिकेट पेमंट अलर्ट तयार केले होते. ज्यावेळी कस्टमर्स पैसे भरत असे त्यावेळी तो अलर्ट कंपनीला जात असे. 

टॅग्स :amazonअॅमेझॉनCrimeगुन्हाPoliceपोलिस