शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

'काहीही फरक...'; अमित शाह अन् महाराष्ट्रातील खासदारांच्या भेटीवर बसवराज बोम्मई बरळले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 12:44 IST

महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रकर्नाटकच्या सीमाप्रश्न पेटला असताना, त्यावर फुंकर घालण्यासाठी आता केंद्र सरकार पुढाकार घेणार आहे. सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात आपण स्वत: हस्तक्षेप करू, तसेच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिले.

मविआ खासदारांनी शुक्रवारी गृहमंत्री शहा यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात तणावाची स्थिती असून, हिंसाचार उफाळला आहे, याकडे या बैठकीत खासदारांनी शहा यांचे लक्ष वेधले. मराठी भाषकांवर वारंवार हल्ले केले जात आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे ही स्थिती गंभीर झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला. मात्र यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत गृहमंत्र्यांना भेटून काहीही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे. 

महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाबाबत मी कर्नाटकच्या खासदारांना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी कळवलं आहे. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे, असं बसवराज बोम्मई यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, १२ डिसेंबरला गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यानंतर, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाला दिले. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, प्रियांका चतुर्वेदी, ओम राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, डॉ.अमोल कोल्हे, काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर, रजनी पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

चार खासदार पंतप्रधानांना भेटले-

महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व मध्य प्रदेशच्या राज्यसभेतील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यात महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश होता. यावेळी वादग्रस्त मुद्द्यांवर कोणतीही चर्चा झाली नाही. भाजपचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांना पत्र पाठविले होते. ते पत्र व या बैठकीचा संबंध नाही. ही नियमित बैठक होती. अशा बैठकीत पंतप्रधान राज्यातील प्रश्न समजून घेतात, असे भाजपचे खा. प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खा. उदयनराजे भोसले, खा. धनंजय महाडिक व खा. डॉ.अनिल बोंडे उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAmit Shahअमित शाहKarnatakकर्नाटकBJPभाजपा