शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

बी. एस. येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणे महागात पडणार; भाजपाचा वापसीचा मार्ग कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 08:35 IST

भाजप कर्नाटकात स्वबळावर निवडणूक लढवणार असून, जनता दल एसशी समझोता करणार नाही.

- संजय शर्मानवी दिल्ली : दक्षिण भारतातील भाजपचा एकमेव बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकात वापसीसाठी पक्षाला संपूर्ण ताकद पणाला लावावी लागत आहे. भाजपला बी. एस. येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदावरून हटवणे महागात पडत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच राज्यात पुन्हा सत्तावापसी करण्यासाठी भाजप रणनीती तयार करण्यात गुंतला आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सध्या उमेदवारांच्या निवडीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कर्नाटकच्या २२४ सदस्यीय विधानसभेत भाजप व एनडीएचे ११९ आमदार आहेत. यातील ४० टक्के आमदारांची तिकिटे कापली जाणार आहेत. भाजप कर्नाटकात स्वबळावर निवडणूक लढवणार असून, जनता दल एसशी समझोता करणार नाही.

कर्नाटकच्या उमेदवार निवडीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली बैठक एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ५ एप्रिलच्या आसपास होणार आहे. ही निवडणूक भाजप पूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा भाजपचे कर्नाटकातील सर्वांत मोठे स्टार प्रचारक असतील. कर्नाटकात भाजप विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना भावी मुख्यमंत्री म्हणून समोर आणणार नाही. बोम्मई यांच्यामुळे भाजपला नुकसान होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर बोम्मई यांना बदलणे पक्षाला योग्य वाटले नाही, असे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर?

राज्याचा आणखी विकास पाहिजे असेल तर राज्यात डबल इंजिनचे सरकार पाहिजे, असे कर्नाटकच्या जनतेला भाजप सांगणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांच्या नावांची घोषणा होताच भाजपकडून राज्यात एकाचवेळी ४० पेक्षा जास्त नेते, केंद्रीय मंत्री, स्टार प्रचारक निवडणुकीच्या प्रचारात उतरणार आहेत. nभाजपचे सर्वांत मोठे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार दौरा ८ ते १० एप्रिलच्या दरम्यान सुरू होणार आहे. मोदी म्हैसूर येथील राष्ट्रीय पार्कमध्ये जाणार आहेत. कर्नाटकच्या नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर प्रचारासाठी सर्वांत जास्त मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आहे. 

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाBJPभाजपाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी