शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमधील असंतुष्ट काँग्रेस आमदार भाजपाच्या संपर्कात; मंत्रिपदं न मिळाल्यानं नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 18:46 IST

काँग्रेस आमदार संपर्कात असल्याच्या वृत्ताला भाजपा नेत्यांचा दुजोरा

बंगळुरु: कर्नाटकमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेस आमदार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांनी काँग्रेसचे प्रभारी के. सी. वेणुगोपाल आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नाराज आमदार भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. यापैकी अनेकांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय जवळपास नक्की केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे आमदार एच. एम. रेवन्ना यांनी भाजपाच्या संपर्कात असल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. मी भाजपा नेत्यांच्या संपर्कात असून भाजपामध्ये प्रवेश करु शकतो, असं रेवन्ना यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. विशेष म्हणजे काँग्रेसचे असंतुष्ट आमदार संपर्कात असल्याच्या वृत्ताला भाजपाच्या नेत्यांनीही दुजोरा दिला आहे. कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी के. सी. वेणुगोपाल आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी त्यांची जबाबदारी नीट पार पाडली नाही, अशी बहुतांश आमदारांची तक्रार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला स्थान मिळेल, अशी अपेक्षा अनेक आमदारांना होती. मात्र बऱ्याच आमदारांची लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. हे आमदार आणि त्यांचे समर्थक येत्या गुरुवारी पक्षाविरोधात आंदोलन करणार आहेत. मंत्रीपद न मिळाल्यानं पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांच्या हालचालींवर वरिष्ठ नेत्यांकडून लक्ष ठेवलं जात असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. शुक्रवारपर्यंत आमदारांची नाराजी दूर झालेली असेल, असा विश्वास काँग्रेसमधील नेते व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८congressकाँग्रेस