शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

कर्नाटक सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचं गिफ्ट; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 15:53 IST

कर्नाटकात आज काँग्रेस-जेडीएस आघाडीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर केला.

बंगळुरू- कर्नाटकात आज काँग्रेस-जेडीएस आघाडीचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. परंतु दुसरीकडे पेट्रोल, डिझेल आणि विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. कुमारस्वामी यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची काही प्रमाणात पूर्तता करण्याचा प्रयत्न केला आहे.2 लाख किंवा त्याहून कमी पैशांचं कर्ज घेणा-या शेतक-यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. कुमारस्वामी यांनी कर्जमाफीसाठी 34000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतक-यांना अंशत: दिलासा देतानाच कुमारस्वामी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.कुमारस्वामी यांनी 2, 13, 734 कोटींच्या अर्थसंकल्पाची घोषणा केली. त्यात ते सिद्धरामय्या सरकारच्या कार्यकाळातील सर्व योजना सुरूच ठेवणार आहेत. कुमारस्वामी यांनी सेवा आणि कृषी क्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. 2016-17मध्ये वृद्धी दर 7.5 टक्के होता तो 2017-18ला वाढून 8.5 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. सरकारनं आपल्या जाहीरनाम्यातून दिलेल्या घोषणा काही प्रमाणात पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. 31 डिसेंबर 2017मधल्या  पहिल्या टप्प्यात काही शेतक-यांचं कर्ज माफ करणार आहे. तसेच ज्या शेतक-यांनी वेळेवर कर्ज फेडलं आहे, अशा शेतक-यांना सरकार 25,000 रुपये देणार आहे.अर्थसंकल्पात पेट्रोलवरी कर 30वरून 32 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे, तर डिझेलवरचा कर 19 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.14 रुपये, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 1.12 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच विजेचे दर 20 पैशांनी वाढवण्यात आले आहे. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)siddaramaiahसिद्धरामय्याFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्जKarnatak Politicsकर्नाटक राजकारण