शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

कर्नाटकात 'तेलही गेले अन्...'; भाजप तोंडघशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 13:59 IST

बहुमत मिळूनही सत्तेची चव चाखायला मिळाली नसल्याने आधीच निराश झालेल्या नेतृत्वाला पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा नामुष्कीजनक हार पत्करावी लागली आहे. 

बेंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या मेमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने सत्ताधारी काँग्रेसचा निसटता पराभव केला असला तरीही भाजपाचे डावपेच चुकले आहेत. बहुमत मिळूनही सत्तेची चव चाखायला मिळाली नसल्याने आधीच निराश झालेल्या नेतृत्वाला पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा नामुष्कीजनक हार पत्करावी लागली आहे. 

कर्नाटमधील आज तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघांचे निकाल स्पष्ट झाले असून काँग्रेस-जेडीएस आघाडी 4 तर भाजपा एकाच जागेवर जिंकली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत दोन खासदारांना आमदारकीसाठी राजीनामा द्यायला लावणे भाजपला महागात पडले आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी शिमोगा मतदारसंघातून लोकसभेवर गेलेले बी एस येडीयुराप्पा यांनी राजीनामा दिला होता. तर बळ्ळारीहून लोकसभेवर गेलेले श्रीरामलू यांनीही आमदारकीसाठी राजीनामा दिला होता. मात्र, भाजपाच्या हा जुगार अंगाशी आला असून बळ्ळारीची जागा मोठ्या फरकाने गमवावी लागली आहे. तर येडीयुराप्पा यांचे पुत्र आणि माजी खासदार राघवेंद्र हे  शिमोगा मतदारसंघातून निवडून आले आहेत. 

कर्नाटक विधानसभेमध्ये भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला केवळ 80 जागांवरच समाधान मानावे लागले होते. मात्र, स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपाचे सत्तास्थापनेचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले होते. यामुळे जेडीएसच्या मदतीने काँग्रेसने सत्ता राखत मुख्यमंत्रीपद जेडीएसकडे दिले होते. या सर्व काळात भाजपवर मोठी नामुष्की ओढवली होती. त्यातच पोटनिवडणुकीतही बळ्ळारीसारखा आर्थिकदृषट्या महत्वाचा असलेला बालेकिल्ला गमवावा लागल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक राहिले असले तरीही भाजपच्या घोडदौडीला काहीसा ब्रेक लागणार आहे. सध्याचे वारे भाजपला अनुकुल नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस