शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कर्नाटकी नाटकाचा दुसरा अंक; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानं तीन आमदार अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 21:26 IST

अपात्र आमदारांमध्ये दोन काँग्रेसचे, तर एक अपक्ष

बंगळुरु: एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार कोसळल्यानंतरही कर्नाटकमधील राजकीय नाट्य संपलेलं नाही. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरवलं आहे. यामध्ये एका अपक्ष आमदाराचा आणि दोन काँग्रेस आमदारांचा समावेश आहे. कुमारस्वामी यांच्या सरकारविरोधात एकूण १७ आमदारांनी बंड केलं होतं. या आमदारांनी त्यांचे राजीनामे रमेश कुमार यांच्याकडे सोपवले होते. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळलं.   रमेश जारकिहोली आणि महेश कुमातल्ली या काँग्रेसच्या २ आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. तर अपक्ष आमदार आर. शंकर यांनादेखील अपात्र ठरवण्याचा निर्णय रमेश कुमार यांनी घेतला. राणेबेन्नूरचे आमदार असलेले आमदार आर. शंकर कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि इतर बंडखोर आमदारांसोबत मुंबईला गेले. शंकर यांनी त्यांचा केपीजेपी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता. मात्र त्यानंतर ते सरकारमधून बाहेर पडले. शंकर आणि काँग्रेसच्या दोन आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आपण विशेषाधिकाराचा वापर करणार असून सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेल्या विश्वासास पात्र ठरणार असल्याचं कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर आणि योग्यतेसंबंधी दाखल झालेल्या याचिकांवर निर्णय घेण्याचे अधिकार कुमार यांच्याकडे आहेत. आता बंडखोर आमदारांना माझ्यासमोर उपस्थित राहण्याची दुसरी संधी मिळणार नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले. त्यामुळे आता कर्नाटकात काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा