शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भाजपाचा उतावळेपणा! निवडणूक आयोगाआधीच जाहीर केली निवडणुकीची तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 11:54 IST

मालवीय यांचे ट्वीटही लगेच व्हायरल झाले.

नवी दिल्ली: मोदी सरकारमुळे देशातील स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य धोक्यात आल्याची हाकाटी विरोधकांकडून पिटली जात असतानाच भाजपा आपल्या अतिउत्साहामुळे तोंडघशी पडली आहे. निवडणूक आयोगाकडून मंगळवारी कर्नाटक विधानसभेच्या तारखांची घोषणा करण्यात आली. मात्र, थक्क करणारी बाब म्हणजे भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी निवडणूक आयोगाच्या आधीच सोशल मीडियावर परस्पर मतदान आणि निकालाच्या तारखा जाहीर केल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कर्नाटक विधानसभेसाठी मतदान 12 तारखेला होईल आणि मतमोजणी 18 तारखेला पार पडेल, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांची पत्रकार परिषद साधारण 11 च्या सुमारास सुरू झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच मालवीय यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तारखा ट्विट केल्या. परंतु, ओमप्रकाश रावत यांनी पत्रकार परिषदेच्या अगदी शेवटी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांपूर्वी अमित मालवीय निवडणुकांच्या तारखा कशा काय जाहीर करू शकतात, असा प्रश्न अनेकांना पडला. विशेष म्हणजे अमित मालवीय यांचे 12 मे रोजी निवडणूक होणार, हे भाकीत खरे ठरले. मात्र, त्यांच्या ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे मतमोजणी ही 18 तारखेला होणार नसून 15 तारखेलाचा होईल, असे ओमप्रकाश रावत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. मालवीय यांच्या ट्विटबद्दल रावत यांना विचारण्यात आले असता रावत यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मालवीय यांचे ट्वीटही लगेच व्हायरल झाले. मात्र त्यांच्या अकाऊंटवर पाहिले असता हे ट्वीट दिसले नाही. त्यामुळे त्यांनी हे ट्वीट डिलीट केल्याची शक्यता आहे.कर्नाटक विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. विधानसभेच्या 224 जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. सिद्धरमैय्या मुख्यमंत्री आहेत. भाजप याठिकाणी भ्रष्टाचार आणि लिंगायत समाजाला धर्माची दर्जा देण्याचा मुद्दा उचलू शकते. गेल्या दोन महिन्यांत राहुल गांधी यांनी चार वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. तर भाजपाध्यक्ष अमित शाहदेखिल गेल्या महिनाभरात दोन वेळा कर्नाटकला गेले आहेत. सोमवारी दुसऱ्यांदा ते कर्नाटकात पोहोचले. एका दिवसांत सात कार्यक्रमांत त्यांनी उपस्थिती लावली. ते लिंगायत आणि दलित समुदायाशी संबंधित मठांचा दौरा करत आहेत.

 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस