शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Karnataka Assembly Election: सत्ता टिकवण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन; राज्यभर PM नरेंद्र मोदींच्या 20 ठिकाणी भव्य सभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 15:57 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत.

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपला निवडणूक प्रचार तीव्र केला आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप यावेळी विजयाची एकही संधी सोडू इच्छित नाही. भाजपचे स्टार प्रचारक राज्यात अनेक सभा घेणार आहेत. पीएम मोदीदेखील आगामी निवडणुकांसाठी राज्यात 20 ठिकाणी प्रचार करणार आहेत.

20 ठिकाणी निवडणूक प्रचार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीकर्नाटकात सुमारे 20 ठिकाणी निवडणूक रॅलींना संबोधित करतील. पंतप्रधानांच्या प्रचार कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून अंतिम रूप दिले जात आहे. काही ठिकाणी पीएम मोदी रोड शोदेखील करणार आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे.

भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी तयार पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मजबूत टीमचा समावेश आहे. पक्षाने जाहीर केलेल्या नेत्यांच्या यादीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, मनसुख मांडविया आणि प्रल्हाद जोशी यांचाही समावेश आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय मध्य प्रदेश आणि आसामचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि हिमंता बिस्वा सरमा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सीएम बसवराज बोम्मई, कर्नाटक भाजपचे प्रबळ नेते बीएस येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री डीव्ही सदानंद गौडा, कर्नाटकातील काही मंत्री आणि राज्यातील पक्षाच्या नेत्यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी