शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

कर्नाटक विधानसभेत गोहत्या बंदीचे विधेयक मंजूर

By मोरेश्वर येरम | Updated: December 9, 2020 19:58 IST

कर्नाटकात आता गोहत्येवर पूर्णपणे बंदी असणार का? यावर बोलताना कर्नाटकचे कायदे, संसदीय कार्य व कायदेमंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी वेगळंच उत्तर दिलं आहे.

कर्नाटक विधानसभेत आज गोहत्या बंदीच्या कायद्याला मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारने गोहत्या बंदीचे विधेयक विधानसभेत मांडले होते. अखेर आज हे विधेयक मंजूर झाले आहे. 

कर्नाटकात आता गोहत्येवर पूर्णपणे बंदी असणार का? यावर बोलताना कर्नाटकचे कायदे, संसदीय कार्य व कायदेमंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी वेगळंच उत्तर दिलं आहे. "कर्नाटकात १३ वर्षांवरील गोहत्येला परवानगी आहे", असं ते म्हणाले आहेत. याआधी पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान यांनी 'द क्विंट'ला दिलेल्या माहितीत नव्या विधेयकानुसार सर्व प्रकारच्या गोवंशाच्या मांसाला यापुढे 'गोमांस' म्हणून संबोधले जाईल, असं म्हटलं होतं. 

विधेयकाची प्रत मिळालेली नाही- सिद्धरामय्यागोहत्या बंदीचे विधेयक कोणत्याही चर्चेविना पटलावर आणल्याचं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांनी म्हटलं होतं. "विधानसभेत आज पशुसंवर्धन मंत्री यांनी प्राणी कत्तल प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक सादर करत असल्याचं जाहीर केलं आणि आम्ही आश्चर्यचकीत झालो. कारण या विधेयकाबाबत कोणतीच चर्चा झाली नाही", असं सिद्धरामय्या म्हणाले. 

दरम्यान, या विधेयकाची प्रत अद्याप मला मिळालेली नाही, असंही ते पुढे म्हणाले. "कोणतंही विधेयक विधीमंडळाच्या पटलावर मांडण्याआधी त्याची प्रत सर्वांना देण्यात येते. पण खुद्द पशुसंवर्धन मंत्र्यांकडेही या विधेयकाची प्रत हातात नव्हती.", असं सिद्धरामय्या म्हणाले.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcowगायYeddyurappaयेडियुरप्पा