शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

'मनी हाईस्ट' बघून लुटलं १७ किलो सोनं, सहा महिने पोलिसांना मिळाला नाही पुरावा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:03 IST

कर्नाटकातल्या मोठ्या चोरीचा पर्दाफाश झाला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली.

Karnataka Crime:कर्नाटकातून चोरीची मोठी घटना समोर आली आहे. कर्ज न मिळाल्याने कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील एका व्यक्तीने बँकेतून तब्बल १७ किलो सोन्याची लूट केली. आरोपीला चोरीची कल्पना स्पॅनिश क्राईम ड्रामा सीरिज 'मनी हेस्ट'मधून सुचली होती. सहा ते सात महिने योजना आखून त्याने बँकेतून १३ कोटींच्या रुपयांच्या सोन्याची चोरी केली. पोलिसांनी आरोपीला अटक करुन त्यांच्याकडून सोनं जप्त केलं आहे. यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या सोन्यासह पत्रकार परिषद घेऊन या घटनेची माहिती दिली. यावेळी जप्त करण्यात आलेले सोनं पाहून एखादं प्रदर्शन सुरु होतं की काय अशी चर्चा सुरु झालीय.

कर्नाटक पोलिसांनी बँकेवर दरोडा टाकून १७.७ किलो सोनं चोरणाऱ्या सहा जणांना अटक केली. २८ ऑक्टोबर 2024 रोजी दावणगिरी जिल्ह्यातील न्यामती इथल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दरोडा पडला होता. पोलिसांनी चोरीचे दागिने तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील उसलमपट्टी शहरातील एका विहिरीतून जप्त केले. चोरीचा मुख्य आरोपी विजयकुमार हा आर्थिक संकटात होता. त्याने ऑगस्ट २०२३ मध्ये एसबीआय बँकेत १५ लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. याच रागातून त्याने बँकेतील १३ कोटी रुपयांचे सोने लुटले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजय कुमार (३०), त्याचा भाऊ अजय कुमार (२८), अभिषेक (२३), चंद्रू (२३), मंजुनाथ (३२) आणि परमदानंद (३०) यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एसबीआय बँकेच्या शाखेच्या कर्मचाऱ्यांना एका स्ट्राँग रूममधील लॉकर गॅस कटरने तोडल्याचे सापडलं होतं. चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी ग्रील उचकटून आत प्रवेश केला आणि लॉकरसोबत घेऊन गेले. आरोपींनी सीसीटीव्ही फुटेज मिळू नये म्हणून बँकेचे डीव्हीआर काढून घेतले आणि  तपासात अडथळा आणण्यासाठी चोरीच्या ठिकाणी मिरचीची पूड फेकली होती.

आरोपी विजयकुमारने त्याच्या पाच साथीदारांसह अनेक महिन्यांपासून बँक लुटण्याची योजना आखली होती. विजयकुमार आणि चंद्रू यांनी अनेकवेळा बँकेत जाऊन पाहणी देखील केली होती. दिवसा पोलिसांनी आणि आजूबाजूच्या लोकांना कळेल म्हणून आरोपींनी रात्री शेतातून बँकेत घुसण्याचे मॉकड्रिल देखील केले होते. त्यानंतर चोरीच्या दिवशी रात्री चोर खिडकीतून बँकेत शिरले. सायलेंट हायड्रॉलिक लोखंडी कटर आणि गॅस कटिंग टूल्सचा वापर चोरट्यांनी बँकेचे लॉकर फोडले. या दरम्यान कोणीही फोन वापरला नव्हता. आरोपींनी स्ट्राँग रूम आणि मॅनेजरच्या केबिनसह सगळ्या बँकेत मिरची पावडर फेकली होती.

चोरी केल्यानंतर आरोपींनी चोरीचे सोने विकण्यास सुरुवात केली. यातून मिळालेला पैसा व्यवसाय आणि घर खरेदीसाठी वापरला. दुसरीकडे पोलीस गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये शोध घेत होते. तपासादरम्यान, पोलिसांना तामिळनाडूमधील एक टीप मिळाली. त्याच्या मदतीने पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. आरोपींच्या अटकेनंतर पोलिसांनी चोरीचे सोने परत मिळवण्यासाठी तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील उसिलमपट्टी भागात मोठी मोहिम सुरू केली. पोलिसांच्या पथकाने स्विमर्सच्या मदतीने ३० फूट खोल विहिरीतून लॉकर बाहेर काढले. त्यात सुमारे १५ किलो सोने होते.

दरम्यान, विहिरीत लॉकर लपवण्याचा कल्पना विजयकुमारची होती. कुणालाही संशय येऊ नये म्हणून ते लॉकर दोन वर्षांनी बाहेर काढण्याचे त्यांनी ठरवलं होतं. मात्र त्याआधीच पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि सगळा प्रकार उघडकीस आला. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस