शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
3
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
4
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
5
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
6
आजचे राशीभविष्य : सोमवार १२ जानेवारी २०२६; या राशीचे लोक आज दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण करू शकतील
7
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग थांबा! 'या' सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त होम लोन; जाणून घ्या
8
मुंबई: नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ, चिठ्ठीत लिहिलं होतं की...
9
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
10
प्रचारासाठी यूपी, बिहारमधून १४२ गाड्या मुंबईत दाखल; वाहनांना आरटीओकडून सशर्त परवानगी
11
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
12
देशातील १० पैकी ७ मोठ्या कंपन्यांचे मार्केट कॅप ३.६३ लाख कोटींनी कमी झालं, रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान
13
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
14
"जो रामाचा नाही, तो कामाचा नाही, ते सत्तेत असताना घरात बसले होते"; देवेंद्र फडणवीस यांची टीका
15
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
16
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
17
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
18
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
19
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
20
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
Daily Top 2Weekly Top 5

'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:25 IST

Karnatak Congress: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा तीव्र झाली आहे.

Karnataka Congress: कर्नाटककाँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. सिद्धरामैय्या यांच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यामुळे, डीके शिवकुमार मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी हालचाली करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील डीके समर्थक आमदार दिल्लीवाऱ्या करत असून, काँग्रेस नेतृत्वाशी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा करत आहेत. अशातच, राहुल गांधी यांनी डीके शिवकुमार यांना थोडा धिर धरण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.

राहुल गांधींकडून शिवकुमारांना मेसेज

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार काही आठवड्यांपासून राहुल गांधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. अखेर राहुल गांधींनी व्हॉट्सअ‍ॅपवर छोटासा मेसेज पाठवत प्रतिसाद दिला. “थोडी वाट पाहा, मी तुम्हाला फोन करतो,” असा राहुल गांधींनी मेसेज पाठवल्याची माहिती आहे. हा मेसेज सध्या सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चेदरम्यान, महत्त्वाचा मानला जात आहे. शिवकुमार 29 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये येण्याची तयारी करत असून त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे भेटीसाठी वेळही मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोनिया-राहुलशी चर्चा करुन निर्णय

दरम्यान, या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले की, ते सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी चर्चा केल्याशिवाय कर्नाटक प्रकरणावर अंतिम निर्णय घेणार नाही. या वक्तव्यामुळे नेतृत्वबदलाबाबतचा निर्णय दिल्लीतील ‘हाय कमांड’कडेच राहणार असल्याचे संकेत अधिक दृढ झाले आहेत.

सिद्धारमैया गटाने चर्चा फेटाळून लावल्या...

सिद्धारमैया समर्थकांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. त्यांचा दावा आहे की, कोणताही औपचारिक अडीच वर्षांचा रोटेशनल करार झालेला नाही. सिद्धारमैया पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Wait, I'll call: Rahul Gandhi to DK Shivakumar Amid CM Change Rumors

Web Summary : Karnataka Congress faces internal strife. DK Shivakumar seeks CM post. Rahul Gandhi messaged Shivakumar to wait, fueling leadership change speculation. Kharge emphasizes decision with Sonia and Rahul. Siddaramaiah's group denies any rotational agreement.
टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी