अरेरे! बहिणीच्या लग्नात सुंदर दिसण्याची हौस पडली महागात; पार्लरमध्ये घडलं भयंकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 15:03 IST2024-04-04T15:01:26+5:302024-04-04T15:03:00+5:30
सुंदर दिसण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये वापरण्यात येणाऱ्या उत्पादनाचा मोठा फटका बसतो. कधी कधी त्यामुळे त्वचेचे किंवा केसांचे नुकसान सहन करावे लागते.

फोटो - hindi.news18
जगातील प्रत्येक मुलीला सुंदर दिसावं असं वाटतं. मात्र काही मुली आता अनेक प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी करून आपलं सौंदर्य वाढवतात. सुंदर दिसण्यासाठी त्या ब्युटी पार्लरमध्ये देखील जातात. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्यूटी पार्लर विविध प्रकारच्या ऑफर्स जारी देत असतात. पण एका मुलीला सुंदर दिसण्याची हौस खूप महागात पडली आहे.
सुंदर दिसण्यासाठी ब्यूटी पार्लरमध्ये वापरण्यात येणाऱ्या उत्पादनाचा मोठा फटका बसतो. कधी कधी त्यामुळे त्वचेचे किंवा केसांचे नुकसान सहन करावे लागते. असाच काहीसा धक्कादायक प्रकार हरियाणातील एका मुलीसोबत घडला. तिच्या केसांची झालेली अवस्था पाहून तुम्हीही घाबरून जाल. दीपिका असं या मुलीचं नाव असून ती रादौरमध्ये राहते.
दीपिका तिच्या आत्याच्या मुलीच्या लग्नासाठी कर्नाल येथे गेली होती. तिथे दीपिका लग्नामध्ये आणखी जास्त सुंदर दिसण्यासाठी एका पार्लरमध्ये गेली. पार्लरमधील महिला वापरत असलेल्या उत्पादनांची एक्सपायरी डेट न तपासण्याची चूक मुलीने केली. परिणामी मुलीचे केस खराब होऊन गळू लागले. लांब दाट केस असलेल्या दीपिकाच्या केसांची वाट लागली आहे. .
तरुणीने तिच्यासोबत घडलेली ही घटना लोकांसोबत शेअर केली. तिने सांगितलं की, स्वस्त वस्तूंना कधीही बळी पडू नये. तसेच, कोणतंही उत्पादन वापरण्यापूर्वी, ते पूर्णपणे नीट तपासलं पाहिजे. शहरात असे अनेक पार्लर आहेत जे ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करतात. त्यामुळे अशा गोष्टींपासून सावध राहा.