Kargil Vijay Diwas : कारगिलच्या युद्धभूमीवर प्राण तळहातावर घेऊन लढले होते 'हे' पिता-पुत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:01 PM2019-07-26T14:01:43+5:302019-07-26T14:02:37+5:30

20 वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी प्राणपणाने लढून पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावले होते. या युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती.

Kargil Vijay Diwas: Father and son 'fought' in the plains of Kargil | Kargil Vijay Diwas : कारगिलच्या युद्धभूमीवर प्राण तळहातावर घेऊन लढले होते 'हे' पिता-पुत्र 

Kargil Vijay Diwas : कारगिलच्या युद्धभूमीवर प्राण तळहातावर घेऊन लढले होते 'हे' पिता-पुत्र 

Next

नवी दिल्ली - 20 वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी प्राणपणाने लढून पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावले होते. या युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती. लेफ्टिनंट जनरल ए.एन. औल आणि कर्नल अमित औल अशी या पिता-पुत्रांची नावे आहेत. गुरुवारी औल पिता-पुत्रांनी कारगिल जिल्ह्यातील द्रास परिसरात असलेल्या लामोचन येथे या युद्धाशी संबंधित असलेल्या आपल्या आठवणी जागवल्या. तसेच शहिदांना श्रद्धांजली वाहिली. 

 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धामध्ये लेफ्टनंट जनरल औल 56 माऊंटन ब्रिगेडचे कमांडर होते. या ब्रिगेडनेच द्रास विभागातील सामरिक दृष्ट्या सर्वात महत्त्वपूर्ण असलेल्या टायगर हिल या शिखरावर कब्जा केला होता. आता लेफ्टनंट जनरल औल  वेस्टर्न कमांडचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदापर्यंत पोहोचून निवृत्त झाले आहेत. 

 लेफ्टिनंट जनरल औल कारगिल युद्धावेळी ब्रिगेडियर होते. तसेच 56 मी माऊंटन ब्रिगेडचे नेतृत्व करत होते. या ब्रिगेडने तोलोलिंग आणि टायगर हिलवर विजय मिळवला होता. त्यावेळी अमित औल हे 3/3 गोरखा रायफल्समध्ये  सेकंड लेफ्टनंट या पदावर कार्यरत होते. आमित मारपो ला परिसरात तैनात होते. 

आता औल आणि त्यांचे कुटुंब पंचकुला येथे राहते. तसेच औल पिता-पुत्रांना त्यांच्या शौर्यासाठी  पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. जनरल औल यांना उत्तम युद्ध सेवा मेडल आणि आणि अमित औल यांना सेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

 याबाबत अमित औल यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी  बातचित करताना सांगितले की, '' युद्ध सुरू असताना मी आईला सर्व गोष्टी सांगू नसेत, असा सल्ला वडिलांनी दिला होता. तू एक सैनिक आहेस आणि युद्धासाठीच बनला आहेस, असे ते म्हणाले होते. दरम्यान, कारगिल युद्ध सुरू असताना मी माझ्या वडिलांशी एकदाही संपर्क केला नव्हता. तसेच युद्ध संपल्यावर सुमारे दोन महिन्यांनंतर आम्ही एकमेकांना भेटलो होतो,''  
 

Web Title: Kargil Vijay Diwas: Father and son 'fought' in the plains of Kargil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.