अजरुन पुरस्कार निवड समिती अध्यक्षपदी कपिलदेव

By Admin | Updated: August 9, 2014 00:31 IST2014-08-09T00:31:05+5:302014-08-09T00:31:05+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी देदीप्यमान कामगिरी करणा:या खेळाडूंची अजरुन पुरस्कारासाठी यंदा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील समिती निवड करणार आहे.

Kapildev elected as the chairman of the Arjuna awards committee | अजरुन पुरस्कार निवड समिती अध्यक्षपदी कपिलदेव

अजरुन पुरस्कार निवड समिती अध्यक्षपदी कपिलदेव

>नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी देदीप्यमान कामगिरी करणा:या खेळाडूंची अजरुन पुरस्कारासाठी यंदा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील समिती निवड करणार आहे. द्रोणाचार्य पुरस्कार निवड समितीचे प्रमुखपद भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार अजितपाल सिंग यांना मिळू शकते.
क्रीडा सचिव अजित शरण म्हणाले, ‘‘अजरुन पुरस्कारासाठी निवड समितीचे प्रमुख कपिलदेव असतील. भारताकडून 16 वर्षे सातत्याने 
131 कसोटी सामने खेळून 434 बळी घेणारे कपिलदेव हे स्वत: 198क् च्या अजरुन पुरस्काराचे मानकरी आहेत. माजी ऑलिम्पियन अजितपाल यांनादेखील अजरुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.’’ 
क्रीडा मंत्रलयाने सांगितले की समितीत असलेल्या सर्वाना या आशयाच्या सूचना पाठविण्यात आल्या आहेत. पुरस्कारांचे वितरण राष्ट्रीय क्रीडादिनी अर्थात 29 ऑगस्ट रोजी होईल. मंत्रलयाला विविध क्रीडा महासंघांकडून खेळाडूंच्या नावाच्या शिफारशी मिळाल्या आहेत. 
पुरस्कार निवड समितीत 12 माजी खेळाडू आणि तीन अधिका:यांचा समावेश आहे. त्यात साईचे महासंचालक, महासचिव आणि क्रीडा मंत्रलयातील उपसचिवांचा समावेश असेल. (वृत्तसंस्था) 

Web Title: Kapildev elected as the chairman of the Arjuna awards committee