शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

पक्षाला अध्यक्षच नाही, मग निर्णय कोण घेत आहे ? काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:50 IST

काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी नेतृत्वावरुन आपल्याच पक्षावर निशाणा साधलाय.

नवी दिल्ली: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आता नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी कायदा मंत्री कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षाला आरसा दाखवला आहे.

'पक्षाला अध्यक्ष नसल्यामुळे ही वेळ'कपिल सिब्बल यांनी आपल्याच पक्षाच्या नेतृत्वार टीका केली आहे. ते म्हणाले, 'पक्षातील आमचे लोक आम्हाला सोडून जात आहेत. सुष्मिता जी पार्टी सोडून निघून गेल्या, फेलेरियो गले, सिंधिया गेले, केरळमध्ये सुधीरन गले, जितिन प्रसाद गेले, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. आता प्रश्न पडतो की, ते का सोडत आहेत ? आपलीच काहीतरी चूक होत असेल, ज्यामुळे अनेकजण पक्ष सोडत आहेत. माझ्या मते पक्षाला नेतृत्व नसल्यामुळे ही गळती होत आहे', असं सिब्बल म्हणाले.

'आम्ही किती काळ थांबायचं'

कपिल सिब्बल पुढे म्हणाले, 'मी फक्त एवढेच म्हणेन की प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने पक्षाला आणखी मजबूत करण्याचा विचार करावा. ज्यांनी पक्ष सोडला, त्यांनाही पक्षात परत आणले पाहिजे. आपल्याला मुक्त संवाद संभाषण आवश्यक आहे. आम्ही काँग्रेस कमकुवत होताना पाहू शकत नाही. आता किती दिवस थांबायचं ? पक्षाला नेतृत्व हवंय.'

'काँग्रेसचे नुकसान म्हणजे देशाचे नुकसान'

सिब्बल म्हणाले, 'मी काँग्रेसच्या विरोधात वक्तव्य करत नाही, मी काँग्रेससोबतच आहे. पंजाबमध्ये घडणाऱ्या घटनांवर मी काहीच बोललो नाही. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. पण, जर हे असेच चालू राहिले, तर भविष्यात अवघड परिस्थिती येईल. काँग्रेसचं नुकसान म्हणजे देशाचा पाया कमकुवत होण्यासारखं आहे.'

'अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हावी'

यावेळी कपिलसिब्बल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीची मागणी केली आहे. ते म्हणाले, 'मागच्या वर्षी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवून प्रश्न उपस्थित केले, त्या नेत्यांच्या बाजुने मी बोलत आहे. तेव्हापासून आम्ही पक्ष हायकमांडच्या कारवाईची वाट पाहत आहोत. पक्षामध्ये अध्यक्ष, काँग्रेस कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समितीची निवडणूक असावी अशी आमची इच्छा आहे', असंही ते म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलRahul Gandhiराहुल गांधी