"द कपिल शर्मा शो"मुळे नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत

By Admin | Updated: April 10, 2017 17:29 IST2017-04-10T17:29:56+5:302017-04-10T17:29:56+5:30

पंजाबचे मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत सापडले आहेत. सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो" मध्ये

"The Kapil Sharma Show" due to Navjot Singh Sidhu in trouble | "द कपिल शर्मा शो"मुळे नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत

"द कपिल शर्मा शो"मुळे नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पंजाबचे मंत्री आणि कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत सापडले आहेत. सोनी टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो" मध्ये अश्लिल विनोद करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात पंजाबच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. वकील एच.सी अरोडा यांनी ही तक्रार केली आहे. शिवाय हायकोर्टातही जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
 
‘द कपिल शर्मा शो"च्या 8 एप्रिलला प्रसारीत झालेल्या भागात सिद्धूंचे विनोद द्विअर्थी होते.   मधील काही विनोद अश्लिल आणि द्विअर्थी असतात, सिद्धूंच्या आक्षेपार्ह विनोदामुळे भावना दुखावल्या, कारण मी पत्नी आणि मुलीसोबत कपिलचा शो पाहात होतो, अशी  अरोडा यांची तक्रार आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या शोमध्ये अश्लिलता असती, तर हा शो अव्वल नसता, असा दावा करत सिद्धू यांनी अरोडा यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
 
यापुर्वी अरोडा यांनी मंत्री झाल्यानंतरही कॉमेडी शोचा हिस्सा राहिल्याबद्दल सिद्धूंविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.    
 
 

Web Title: "The Kapil Sharma Show" due to Navjot Singh Sidhu in trouble