Video: केजरीवालांच्या वाढदिवशी कपिल मिश्रांकडून 'सोनू' व्हर्जनचं 'पोल-खोल' गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 18:08 IST2017-08-17T16:53:19+5:302017-08-17T18:08:52+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल जन्मदिनानिमित्त देशभरातून शुभेच्छा आल्या. पण सगळ्यात हटके शुभेच्छा दिल्या त्या आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर नेते आणि माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी

Video: केजरीवालांच्या वाढदिवशी कपिल मिश्रांकडून 'सोनू' व्हर्जनचं 'पोल-खोल' गिफ्ट
नवी दिल्ली, दि. 17 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल जन्मदिनानिमित्त देशभरातून शुभेच्छा आल्या. पण सगळ्यात हटके शुभेच्छा दिल्या त्या आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर नेते आणि माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी. त्यांनी सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या सोनू गाण्याच्या आधारावर एक गाणं सादर करून केजरीवालांना नेहमी आठवणीत राहील असं गिफ्ट दिलं आहे. मिश्रा यांनी सोनूचं नवं व्हर्जन तयार करत 'एके तुझे खुदपर भरोसा नहीं क्या’? असे बोल असलेल्या या गाण्याच्या माध्यमातून केजरीवालांवर निशाणा साधला आहे. या गाण्यातून त्यांनी पुन्हा एकदा केजरीवालांवर आणि दिल्ली सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच केजरीवालांनी आरोपांवर उत्तर देण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ-
Birthday surprise for you @arvindkejriwal ... Soon all Delhi will sing this for you ..Enjoy!!! #AKतेरीकुर्सीगोलhttps://t.co/XEZZE2KKzB
— Kapil Mishra (@KapilMishraAAP) August 16, 2017
आणखी वाचा- (कपिल मिश्रांना केजरीवालांच्या पत्नीचे चोख उत्तर)