कानपूर रेल्वे दुर्घटना; मुख्य संशयित अटकेत

By Admin | Updated: February 8, 2017 05:34 IST2017-02-08T05:34:12+5:302017-02-08T05:34:12+5:30

कानपूर येथे गेल्या वर्षी झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेतील प्रमुख संशयित समशूल होडा याला येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली.

Kanpur Railway Accident; Main suspect arrested | कानपूर रेल्वे दुर्घटना; मुख्य संशयित अटकेत

कानपूर रेल्वे दुर्घटना; मुख्य संशयित अटकेत

काठमांडू : कानपूर येथे गेल्या वर्षी झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेतील प्रमुख संशयित समशूल होडा याला येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली. समशूल नेपाळी नागरिक असून, दुबईने प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला बेड्या ठोकल्या.
समशूल पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचा कथित एजंट आहे. आधी तो अपघात असल्याचेच अंदाज बांधले जात होते. मात्र अन्य प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका गुन्हेगाराच्या जबानीतून हा घातपात असल्याचे निदर्शनास आले. नेपाळ पोलिसांच्या विशेष पथकाने होडा (४८) याला इतर तीन जणांसह अटक केली. होडाला त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी अटक केली, असे पोलीस उप महानिरीक्षक पशुपती उपाध्याय यांनी सांगितले.

Web Title: Kanpur Railway Accident; Main suspect arrested