शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 14:42 IST

हॉस्पिटलचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती वृद्ध वडिलांना उचलून घेऊन हॉस्पिटलमध्ये चकरा मारताना दिसत आहे.

यूपीच्या कानपूरमधील हॅलट हॉस्पिटलचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती वृद्ध वडिलांना उचलून घेऊन हॉस्पिटलमध्ये चकरा मारताना दिसत आहे. एकाही वॉर्ड बॉयने त्याला मदत केली नाही, तसेच स्ट्रेचरही मिळू शकला नाही. मुलगा आपल्या 70 वर्षांच्या वडिलांना उचलून घेऊन मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी इकडे तिकडे फिरत होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूपीतील आरोग्य यंत्रणेची पोलखोल झाली आहे. यावरून सपाने योगी सरकारवरही निशाणा साधला आहे.

हा धक्कादायक प्रकार ज्यावेळी घडला जेव्हा आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव पार्थ सारथी सेन शर्मा स्वतः GSVM कॉलेजमध्ये उपस्थित होते. असं असूनही कोणी मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. प्रमुख सचिवही वडिलांना उचलून घेऊन जाणाऱ्या मुलाकडे पाहत राहिले. नंतर तरुणाला वडिलांसाठी स्ट्रेचर मिळाला आणि उपचारासाठी कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. 

शुक्लागंज येथील रहिवासी अरविंद यांनी सांगितलं की, त्यांचे 70 वर्षीय वडील श्याम सुंदर यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले, परंतु त्यांना आराम मिळाला नाही. दोन आठवड्यांपासून त्यांनी खाणे, पिणे आणि चालणे देखील बंद केले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना हॅलेट रुग्णालयात आणलं. डॉक्टरांनी त्यांच्या काही चाचण्या करायला सांगितल्या पण स्ट्रेचर न मिळाल्याने मुलाने वडिलांना उचलून घेतलं.  या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाने सरकारवर निशाणा साधत राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात वर्षात जनता या सगळ्याला कंटाळली असून, आता भाजपाला हरवून परत पाठवणार असल्याचं म्हटलं आहे

याबाबत मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संजय काला म्हणाले की, दुपारी सचिवांसोबत आम्ही हॉस्पिटलमध्ये राऊंड मारत होतो. त्याचवेळी एक व्यक्ती आपल्या वडिलांना उचलून घेऊन आला. मात्र हा ब्लॉक हॉस्पिटलच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे आहे. येथे व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरची सोय नाही. मात्र हा आमच्या हॉस्पिटलचाच एक भाग आहे असे दाखवले जात आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटल