शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 14:22 IST

दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली. या आगीत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीमुळे घरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे पती-पत्नी आणि मोलकरणीचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच घरातील पाळीव मांजराचाही मृत्यू झाला.

मृतांमध्ये काकादेवच्या पांडू नगर येथील रहिवासी बिस्कीट व्यावसायिक संजय श्याम दसानी, पत्नी कनिका दसानी आणि मोलकरीण छवी यांचा समावेश आहे. दिवाळीच्या दिवशी तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक रात्रीच घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. त्यानंतर घरातील लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री घडली. संजय श्याम दसानी (48) हे त्यांची पत्नी कनिका श्याम दसानी आणि घरातील मोलकरीण छवी चौहान यांच्यासोबत पांडू नगर येथील एका घरात राहत होते. दिवाळीच्या दिवशी पूजेनंतर कुटुंबीय देवघरात दिवा लावून झोपले होते. मात्र याच दरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे तिघांना जीव गमवावा लागला.

ही आग संपूर्ण खोलीत पसरली, असं सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर घरात धुराचे लोट पसरले, त्यामुळे तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. रात्री १२ वाजल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांसह अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक टीमही तेथे होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :fireआगHomeसुंदर गृहनियोजनUttar Pradeshउत्तर प्रदेश