शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

"23 किलो सोनं माझं नाही...";पीयूष जैनच्या घरी छापेमारीत सापडलेली 197 कोटींची रोख रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 10:12 IST

कानपूरमध्ये राहणारा व्यावसायिक व्यापारी पीयूष जैनच्या घरावर छापा टाकला होता आणि 197 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती.

कानपूरचा व्यावसायिक पीयूष जैन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पीयूष जैन हा तोच व्यावसायिक आहे ज्यांच्या जागेवर डीजीजीआयने तीन वर्षांपूर्वी मोठा छापा टाकला होता. ज्यामध्ये तब्बल 197 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. याशिवाय 23 किलो सोन्याची बिस्किटेही सापडली आहेत. आता पीयूष जैनने हे 23 किलो सोने सरेंडर केलं आहे.

2021 च्या अखेरीस, DGGI (Directorate General of GST Intelligence)अहमदाबादच्या टीमने कानपूरमध्ये राहणारा व्यावसायिक व्यापारी पीयूष जैनच्या घरावर छापा टाकला होता आणि 197 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. यानंतर त्याच्या कनौज येथील फॅक्टरी आणि हवेलीवर छापा टाकून 23 किलो सोने आणि चंदनाचं तेल जप्त करण्यात आलं. याप्रकरणी पीयूष जैन तुरुंगात गेला होता.

कन्नौजमध्ये सोनं सापडल्याप्रकरणी लखनौच्या डीआरआय टीमने पीयूष जैन यांच्याविरुद्ध 135 कस्टम ॲक्ट अंतर्गत एफआयआर दाखल केला होता. ज्याची केस चालू होती. या प्रकरणी आता पीयूष जैनच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे की, माझ्या जागेवरून कस्टमने जप्त केलेलं 23 किलो सोने कंपाऊंडिंग करण्यात यावं. याआधी त्याने सोन्यावर दावा ठोकला होता. ज्याची 60 लाखांची पेनल्टी जमा केली होती. तसेच त्याला आपल्या बाजुने ते रिलीज करण्याचं अपील देखील केलं आहे.  

कानपूरमधील डीजीजीआयचे सरकारी वकील अंबरीश टंडन म्हणतात की, पीयूष जैनने  56 लाख 86 हजार रुपये कंपाउंडिंग फी जमा केली आहे आणि दावा केला आहे की त्यांच्या घरातून जप्त केलेले 23 किलो सोने कंपाऊंड करावं. म्हणजेच एकप्रकारे त्याने हे सोने सरेंडर केलं आहे. या प्रकरणी आता कस्टमच्या कलम 135 मधून दिलासा मिळावा यासाठी कोर्टाकडे अपील केलं आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार आता त्यांच्यावतीने जबाब नोंदवला जाणार आहे.

कन्नौजमध्ये 27 डिसेंबर 2021 रोजी डीजीजीआय अहमदाबादच्या टीमने पीयूष जैन यांच्या घरातून 23 किलो सोन्याची जप्ती दाखवली होती आणि हे सोनं विदेशी असल्याचा दावा केला होता. मात्र आता पीयूष जैन आपल्याला हे सोनं नको असल्याचा दावा करत आहेत. त्याने सोन्याचा दावा करणारं आपलं अपील देखील मागे घेतलं आहे. तसेच कम्पाउंडींग फी जमा केले. सध्या पीयूष जैन जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाGoldसोनं