शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

"वेळेत पोहोचली नाही रुग्णवाहिका, रुग्णालयात नव्हते डॉक्टर"; मृतांच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 10:56 IST

अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांनी आता गंभीर आरोप केला आहे. रुग्णवाहिका आणि रुग्णालयात डॉक्टर नसल्याचं म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर भागात भीषण अपघात झाला आहे. उन्नावहून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने 25 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्य सुरू केले आहे. याच दरम्यान अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांनी आता गंभीर आरोप केला आहे. रुग्णवाहिका आणि रुग्णालयात डॉक्टर नसल्याचं म्हटलं आहे.  भीषण अपघातात जीव गमावणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रुग्णालयात आम्ही आमच्या माणसांना उपचारासाठी घेऊन आलो तेव्हा तिथे कोणी डॉक्टरच नव्हते. तसेच लोकांनी अपघात झाल्यावरही रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे बाईकवरून जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं. भीतरगाव येथील सीएचसीमध्ये एक बेडवर तीन-तीन मृतदेह ठेवण्यात आले आहेत. मृतदेहांचं आता पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. 

गंभीर जखमी यात्रेकरूंवर उपचार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, हे यात्रेकरू उन्नावमधील बक्सर येथील चंद्रिका देवी मंदिराचे दर्शन करून आपल्या गावी कोरथा येथे परतत असताना साढ पोलीस स्टेशन हद्दीतील गौशाळेजवळ ही ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. या अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तात्काळ जवळच्या सीएचसी रुग्णालयात दाखल आले. या ठिकाणी  24 जणांना मृत घोषित करण्यात आले, तर इतर गंभीर जखमी यात्रेकरूंवर उपचार सुरू आहेत. 

मदतकार्य युद्धपातळीवर सुरू

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमधील या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना करताना, शोकाकुल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशAccidentअपघात