कन्हैय्या कुमारने घेतली राहुल गांधींची भेट
By Admin | Updated: March 22, 2016 13:14 IST2016-03-22T13:14:55+5:302016-03-22T13:14:55+5:30
कन्हैय्या कुमार बुधवारी हैदराबाद विश्वविद्यापीठाला भेट देणार आहे. त्याअगोर त्याने राहुल गांधींची भेट घेतली आहे

कन्हैय्या कुमारने घेतली राहुल गांधींची भेट
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २२ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. कन्हैय्या कुमार बुधवारी हैदराबाद विश्वविद्यापीठाला भेट देणार आहे. त्याअगोर त्याने राहुल गांधींची भेट घेतली आहे.
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर राहुल गांधी कन्हैय्या कुमारच्या सर्मथनार्थ उतरले होते. त्यांनी जेएनयूला भेटदेखील दिली होती ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. कन्हैय्या कुमारच्या अटकेवरुन राहुल गांधी यांनी केद्र सरकारवर जोरदार टीकादेखील केली होती.
कन्हैय्या कुमारची जामीनावर सुटका झाल्यानंतर प्रथमच त्याने राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. कन्हैय्या कुमार बुधवारी हैदराबाद विश्वविद्यापीठाला भेट देणार आहे त्यावेळी रोहीत वेमुलाच्या मित्रांना भेटून त्यांच्याशी संवाददेखील साधणार आहे.
Delhi: Kanhaiya Kumar leaves from Congress Vice president Rahul Gandhi's residence after meeting him. pic.twitter.com/MqLVVgopVv
— ANI (@ANI_news) March 22, 2016